 
						Multibagger Stocks | रोलेक्स रिंग्सचा शेअर चा IPO आला होता आणि त्याची लिस्टिंग प्राईस रु. 900 होती आणि आता हा शेअर IPO किमतीपेक्षा 91% वाढीसह रु. 1721 वर ट्रेड करत आहे. गेल्या आठवड्यात हा स्टॉक 1879.95 रुपयावर पोहोचला आणि 52 आठवड्याचा उच्चांक गाठला. 900 रुपयेला शेअर बाजारावर लिस्ट झालेला हा स्टॉक सध्या 1879.95 वर पोहोचला. ही या शेअरची 52 आठवड्याची सर्वाधिक उच्च किंमत आहे.
जागतिक घडामोडीचा परिणाम :
कोविड-19 महामारी, लॉकडाऊन मुळे आणि जागतिक व्यापारात आलेल्या अडचणी मुळे भारतीय नाही तर संपूर्ण जागतिक शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी गेली दोन वर्षे अत्यंत निराशाजनक ठरली होती. वैश्विक गुंवणुक बाजारातील परिस्थिती आता कुठे सुधारत होती त्यात अचानक सुरू झालेल्या रशियन-युक्रेन युद्धाने पुन्हा गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आणि गुंतवणूकदार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. परंतु असे असूनही, भारतीय शेअर बाजारात अश्या काही कंपन्यांचे शेअर्स आहेत ज्यांच्या वर कोणत्याही नकारात्मक गोष्टींचा परिणाम झालेला नाही आणि या काळात कंपन्यांनी उत्कृष्ट परतावा दिला आहे. याच यादीत एक जबरदस्त स्टॉक आहे तो म्हणजे ऑटो कंपोनंट मेकर रोलेक्स रिंग्ज शेअर. मागील वर्षभरात या शेअर आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
IPO लिस्टिंग आणि ट्रेड प्राईस: 
रोलेक्स रिंग्सचा शेअर रु. 900 च्या IPO किमतीवर लिस्ट झाला होता आणि तो सध्या 91% वाढीसह रु. 1721 वर ट्रेड करत असून गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. मागील ट्रेडिंग सेशन मध्ये हा स्टॉक 1879.95 रुपयांवर म्हणजेच 52 आठवड्याच्या सार्वकालिक उच्चांक पातळीवर पोहोचला. बाजारात अस्थिरतेचे वातावरण असून सुद्धा आणि सतत होणारी पडझड आणि महागाई आणि जागतिक अस्थिरता असूनही या स्टॉकने मागील सहामाही काळात आपल्या गुंतवणूकदारांना 60% परतावा दिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप म्हणजे बाजार भांडवल 4686 कोटी रुपये आहे.
सहामाही तील शेअरची कामगिरी?
आकडेवारीवरून निरीक्षण केले तर आपल्या दिसेल की मागील 6 महिन्यांत या शेअरच्या किमतीत 32.43% वाढ झाली आहे. सहा महिन्यापूर्वी कंपनीच्या शेअरची किंमत 1318 रुपये होती आणि गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवल्यामुळे 1318 रुपये वर ट्रेड करणारा शेअर 1748.55 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. मागील ट्रेडिंग सेशन मध्ये शेअरच्या किमतीत 0.13% ने वाढ झाली आहेत.
स्मॉल कॅप स्टॉकमधील जोखीम:
स्मॉल कॅप स्टॉक मध्ये गुंतवणूक करणे हे थोडे जोखमेचे असते. कारण वेगवेगळ्या घटकांचा परिणाम त्यावर पडत असतो आणि स्मॉल कॅप शेअर यांना जलद प्रतिसाद देतात अशा परिस्थितीत ज्या गुंतवणूकदारांना कमी जोखीम घेणे आवडते त्यांनी अश्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सध्या लाँग टर्म गुंतवणूकदारांनी अश्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे टाळावे. ऑटो कंपोनंट क्षेत्रातील रोलेक्स रींग्ज गुजरातची सर्वोत्तम कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1997 मध्ये झाली होती आणि कंपनी ने मागील वर्षी 9 ऑगस्ट 2021 रोजी आपला IPO बाजारात आणला होता त्याची बेस प्राइस 900 रुपये होती आणि तो 1249 रुपयांना सूचीबद्ध झाली.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		