
Hot Stocks | आज आपण ज्या कंपनी बद्दल माहिती घेणार आहोत त्या कंपनीने एका दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 19 टक्के परतावा मिळवून दिला आहे. सोमवारी या कंपनीचा शेअर दिवसा अखेर 431.55 रुपयांवर बंद झाला. NSE मध्ये इंट्राडे ट्रेडिंग निर्देशांकात स्टॉक मध्ये 18.56 टक्के वाढ पाहायला मिळाली आणि आता हा स्टॉक 511.65 रुपये वर ट्रेड करत आहे.
औद्योगिक पेंट्स सेक्टर मधील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाणारी केन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडने जून तिमाहीत जबरदस्त कमाई केली होती आणि गुंतवणूकदारांना मालामाल केली होते. कंपनीच्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, निव्वळ नफा वार्षिक आधारावर 36.5 टक्के वाढला असून 152 कोटी रुपये पर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, वार्षिक व्यावसायिक महसूल 46.2 टक्के वाढला असून 2,051 कोटी रुपये नफा जाहीर केला आहे. कंपनीचा त्रैमासिक निकाल अपेक्षेपेक्षा चांगला होता. त्यामुळेच कंपनीचे शेअर्स आज रॉकेट सारखे वर जाताना दिसत आहेत. मंगळवारी एका दिवसात स्टॉक मध्ये जवळपास 19 टक्के ची वाढ पाहायला मिळाली.
स्टॉक गेला 431.55 रुपये वरून 511.65 रुपये वर :
सोमवारी दिवसा अखेर कंपनीचा स्टॉक 431.55 रुपये वर बंद झाला. आज शेअर्स NSE वर इंट्राडे मध्ये 18.56 टक्केच्या वाढीसह 511.65 रुपयेवर ट्रेड करताना दिसत आहे. केन्साई नेरोलॅकचे ग्रॉस मार्जिन 442 दशांश घसरणी सह वर्षानुवर्षे घट 29.9 टक्के पर्यंत आली आहे. पण आता त्यात 195 दशांश ची वाढ होताना दिसत आहे. एबिटा मार्जिन दर वार्षिक 121 दशांश घसरून 13.1 टक्के वर आला आहे आणि तिमाही दर मध्ये थोडी वाढ झाली आहे.
कंपनीचे शेअर्स वाढी बाबत मत :
कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, “या तिमाहीत सणासुदीची आणि सजावटीच्या कामाची आणि औद्योगिक पेंट्सना चांगली मागणी होती. सेमी कण्डस्क्टर चिपची कमतरता हळूहळू कमी झाल्यामुळे ऑटोमोटिव्हमधील वाढत्या मागणीमुळे औद्योगिक क्षेत्रातील मागणी सुधारली आहे.याचा सकारात्मक परिणाम स्टॉक वर होताना दिसत आहे. त्यामुळे कंपनीने सजावट आणि औद्योगिक उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. म्हणून पुढील काळात नफ्यात वाढ होताना दिसेल ह्यात काही शंका नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.