27 April 2024 6:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा धक्का | आठवा वेतन आयोग येणार नाही, मोदी सरकारचे स्पष्टीकरण

No Eighth pay commission

No Eighth Pay Commission | केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन सुधारण्यासाठी सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण मोदी सरकारकडून करण्यात आले आहे. आठव्या वेतन आयोगाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पण तो लागू होणार की नाही याबाबत साशंकता होती. परंतु या संदर्भात मोदी सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. या माहितीनुसार, आठवा वेतन आयोग येणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

दावा निराधार :
आठवा वेतन आयोग येणार असल्याचा दावा निराधार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार आठवा वेतन आयोग आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. परंतु असा कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले.

पुढील वेतन आयोगाची गरज नाही :
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, पे मॅट्रिक्समध्ये वेळोवेळी बदल व्हायला हवेत आणि त्यासाठी पुढील वेतन आयोगाची गरज नाही, असा सूचना नक्कीच देण्यात आली आहे. अशा स्थितीत अॅक्रॉईड फॉर्म्युलाच्या आधारे पुनरावलोकन करून त्यात सुधारणा करता येऊ शकतात. यामुळे सर्वसामान्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किमती लक्षात घेऊन बदल करता येऊ शकतात.

वाढत्या महागाईमुळे :
दरम्यान वाढत्या महागाईमुळे, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महागाई भत्ता आणि महागाई सवलतमध्ये चार टक्क्यांची वाढ होईल, अशी अपेक्षा केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होती. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सरकारने डीए वाढवल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: No Eighth pay commission will be appointed says Modi government check details 06 August 2022.

हॅशटॅग्स

#No Eighth pay commission(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x