नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार बेरोजगारीच्या वास्तवावरून तोंडघशी पडलं आहे. एवढंच नाही तरी मोदी सरकारने मागील ४५ वर्षातील बेरोजगारीचा विक्रम केल्याचे एका सरकारी अहवालातूनच सिद्ध झालं आहे.

देशातील यंदाचा बेरोजगारीचा दर हा मागील ४५ वर्षातील सर्वाधिक असल्याचं राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. देशातील २०१७-१८ चा बेरोजगारीचा दर हा तब्बल ६.१ टक्के इतका आहे. दरम्यान, सदर अहवालानुसार १९७२-७३ पासूनच्या जेव्हा देशात भीषण दुष्काळ पडला होता, तेव्हा पासून बेरोजगारीचा हा दर सध्या सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, विरोधकांनी मोदी सरकारच्या २ करोड रोजगाराच्या आश्वासनांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. या अहवालाचा दाखल देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘हुकूमशाह मोदींनी सत्तेतून जाण्याची वेळ आली आहे, हुकूमशाहने वर्षाला २ कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले, बेरोजगारीचा दर ४५ वर्षांमधील सर्वात जास्त असल्याचे भीषण वास्तव या अहवालातून उघड झाले. २०१७- १८ या वर्षात ६.५ कोटी तरुण बेरोजगार होते, पण ५ वर्षांनी एका अहवालाने देशातील बेरोजगारीचं भीषण वास्तव उघड झालं आहे आणि आता मोदींची जाण्याची वेळ आली आहे’, #HowsTheJobs असा हॅशटॅग वापरत ट्विट करून राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष केले आहे.

modi government has made the history of unemployment in the nation says government report