 
						Multibagger Stocks | 11 सप्टेंबर रोजी प्रेमको ग्लोबल कंपनी आपल्या भागधारकांना लाभांश वितरित करेल असे जाहीर करण्यात आले आहे. प्रेमको ग्लोबल आपल्या गुंतवणूकदारांना 11 सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी लाभांश वितरित करेल अशी माहिती स्टॉक एक्सचेंजला देण्यात आली आहे. भागधारकांना मागील काही कळत 9,000 टक्के इतका भरघोस परतावा देणारी प्रेमको ग्लोबल कंपनी आता प्रती शेअर 20 टक्के लाभांश देणार असल्याचे झाले आहे. 25 ऑगस्ट 2022 ही तारीख कंपनीने ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे.
ठळक मुद्दे :
* प्रेमको ग्लोबल कंपनी दर्शनी मूल्य 10 रुपये असलेल्या शेअर्सवर 20 टक्के लाभांश देणार आहे.
* 25 ऑगस्ट 2022 ही कंपनीने रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
* कंपनीच्या समभागांची मागील 5 वर्षांची कामगिरी चांगली नाही.
शेअर बाजारात शेअर्स वर मिळणारा लाभांश हा देखील कमाईचा एक मार्ग असतो. लाभांश म्हणजे कंपनी प्रत्येक शेअरच्या दर्शनी मूल्याच्या काही टक्के रक्कम नफ्यातील भाग त्यांच्या शेअरधारकांना देते. यामुळे अनेकांचे झालेले नुकसान कमी होते. प्रेमको ग्लोबल लिमिटेड अशीच एक कंपनी आहे जी वस्त्रोद्योगाशी संबंधित असून त्यांनी भरघोस लाभांश जाहीर केला आहे. प्रेमको ग्लोबल लिमिटेड आपल्या गुंतवणूकदारांना लवकरच लाभांश देणार असल्याचे जाहीर केले आहे.
प्रेमको ग्लोबल ही एक स्मॉल कॅप कंपनी असून त्यांनी मागील काही वर्षांत आपल्या भागधारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षांत 4.50 रुपयांवरून 400 रुपयांच्या वर गेले आहेत. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी आपल्या गुंतवणूकदारांना 9000 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. कंपनी आर्थिक वर्ष 2022-23 साठी आपल्या गुंतवणूकदारांना पहिला अंतरिम लाभांश देणार असल्याचे जाहीर केले आहे.
किती लाभांश मिळेल ?
कंपनी प्रती शेअर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 20 टक्के लाभांश देणार आहे. म्हणजे प्रत्येक शेअरला 2 रुपयेचा लाभांश मिळेल. कंपनीने आपल्या पहिल्या अंतरिम लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 25 ऑगस्ट 2022 निश्चित केली आहे. म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी हा स्टॉक एक्स-डिव्हिडंड देईल. ह्या तारीख पर्यंत या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना लाभांश मिळेल आणि त्यानंतर कंपनीचे शेअर्स खरेदी करणाऱ्यांना कोणताही लाभांश मिळणार नाही. कंपनी 11 सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी लाभांश वितरीत करेल.
शेअर्सचा किमतीचा इतिहास :
27 ऑगस्ट 2004 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर प्रेमको ग्लोबलचे शेअर्स 4.51 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 12 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 442.05 रुपयांच्या पातळीवर जाऊन बंद झाले होते. जर तुम्ही 27 ऑगस्ट 2004 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमची गुंतवणूक 98 लाखांच्या जवळपास गेली असते. प्रेमको ग्लोबलच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी 290.55 रुपये च्या जवळपास आहे. त्याच वेळी, शेअर्स चा 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 567 रुपये आहे. प्रेमको ग्लोबलच्या शेअर्समध्ये मागील 30 महिन्यांत खूप जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. 26 मार्च 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये कंपनीचे शेअर्स 46 रुपयांवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 26 मार्च 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि तुमची गुंतवणूक बोल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमची गुंतवणूक 9.60 लाख रुपये झाली असती.
5 वर्षांत खराब कामगिरी :
या शेअर्स मध्ये मागील 30 महिन्यांत थोडी फार तेजी दिसली असेल पण गेल्या 5 वर्षात ह्या शेअर्स मुले गुंतवणूकदारांचे 2 टक्के नुकसान झाले आहे. याशिवाय, मागील काही काळापासून हा स्टॉक अनेक अनिश्चिततेतून जाताना दिसत आहे. आणि त्यात अचानक मोठी वाढ किंवा अचानक मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात हा शेअर तब्बल 34 टक्क्यांनी वधारला होता, तर मागील 1 वर्षात स्टॉक 11 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 111 कोटी रुपये नोंदवण्यात आले आहे. जूनच्या तिमाहीत कंपनीला फक्त 2 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीला फक्त 6 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		