16 May 2024 11:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारातून बचत करा! SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' योजना मालामाल करतील, बचत अवघी रु. 500 Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय
x

Multibagger Stocks | या शेअरच्या गुंतवणूकदारांना लॉटरी लागली, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे करोडो रुपये झाले, स्टॉक पुढेही नफ्याचा

Multibagger Stock,  astral Limited

Multibagger Stocks | Astral Ltd. कंपनीने जून तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त महसूल कमावला आहे. कंपनीच्या महसुलात जूनच्या तिमाहीत वार्षिक 73 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण महसूल 1213 कोटी रुपये झाला आहे. ब्रोकरेज फर्म शेअरखानने Astral कंपनीचे उत्कृष्ट निकाल पाहून या मल्टीबॅगर स्टॉकला बाय (खरेदी) रेटिंग दिले आहे.

ठळक मुद्दे :
* कंपनीचा एकूण महसूल जून तिमाहीत वार्षिक 73 टक्क्यांनी वाढला.
* एकूण महसूल 1213 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
* कंपनीच्या पाईप्स, अॅडेसिव्ह आणि पेंट्सच्या उत्पन्नात जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे.

शेअर्सला बाय रेटिंग :
एस्ट्रल लिमिटेड शेअर्सला बाय रेटिंग देताना, शेअरखानने त्याची पुढील काळातील लक्ष्य किंमत 2,300 रुपये निश्चित केली आहे. Astral Ltd hi कंपनी PVC आणि CPVC पाईप्सचे उत्पादन करणारी एक दिग्गज कंपनी आहे. कंपनीचे बाजार भांडवल 39,897.91 कोटी रुपये असून ही एक लार्ज कॅप कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्सने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. १५ वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये ज्या लोकांनी एक लाख रुपये गुंतवले होते, त्या गुंतवणूकदाराना आता करोडो रुपयांचा परतावा मिळाला आहे. जून तिमाहीमधील कंपनीचा जबरदस्त निकाल पाहता, विश्लेषक आणि गुंतवणूकदार या शेअर्स च्या बाबतीत जबरदस्त उत्साही दिसत आहेत.

52 आठवड्यांचा उच्चांक :
शुक्रवारी अॅस्ट्रल लिमिटेडचा शेअरमध्ये 1.07 टक्के वाढ झाली होती आणि या वाढीसह शेअर 2,000 रुपयांवर जाऊन बंद झाला होता. 16 ऑगस्ट रोजी, ह्या स्टॉकमध्ये 2.78 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात हा स्टॉक मध्ये 1.99 टक्क्यांची घसरण झाली आहे. 2022 मध्ये ह्या स्टॉक मध्ये आतापर्यंत 14.24 टक्क्यांनी पडझड पाहायला मिळाली होती. 17 जानेवारी 2022 रोजी Astral Limited च्या शेअरने 2,524.95 रुपयांवर जाऊन आपला 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. या शेअर्सचा 52 आठवड्यांची नीचांक पातळी 1,581.55 रुपये आहे.

गुंतवणूकीवर परतावा :
मागील तीन वर्षांत अॅस्ट्रल लिमिटेडच्या शेअरमध्ये 170 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, मागील पाच वर्षात या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 404.82 टक्के इतका जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. काही काळापूर्वी हा स्टॉक 396.18 रुपयेवर ट्रेड करत होता तो आता 2,000 रुपयापर्यंत पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, मागील पंधरा वर्षांत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 35,806.64 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मार्च 2007 मध्ये शेअर फक्त 5.57 रुपयेवर ट्रेड करत होता, आज तो 2000 रुपयांपर्यंत वाढला आहे. सध्या, हा स्टॉक त्याच्या 52.आठवड्याच्या उच्चांक पातळीच्या 20.79 टक्के खाली ट्रेड करत आहे. आणि त्याच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीपेक्षा 26.45 टक्के खाली व्यापार करत आहे.

एक लाख रुपयांवर दिला 3.59 कोटी परतावा :
जर तुम्ही 15 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुमची गुंतवणूक 3.59 कोटी रुपये झाली असती. त्याचप्रमाणे जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज या स्टॉकने तुम्हाला 5.05 कोटी रुपयांचा परतावा दिला असता.

शेअरखानने दिला खरेदी करण्याचा सल्ला :
ब्रोकरेज फर्म शेअरखान म्हणते की एस्ट्रल लिमिटेड कंपनीने अपेक्षेपेक्षा अधिक महसूल कमावला केला आहे. कंपनीचा एकूण महसूल जून तिमाहीत वार्षिक 73 टक्क्यांनी वाढला आहे, आणि 1,213 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. कंपनीच्या पाईप्स, अॅडेसिव्ह आणि पेंट्सच्या विक्री उत्पन्नात जब्बरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. एस्ट्रल लिमिटेडला बाय (खरेदी) रेटिंग देताना, शेअरखानने त्याची पुढील लक्ष्य किंमत 2,300 रुपये असू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks astral Limited share price return on 17 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x