29 April 2024 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

IRCTC Railway Ticket | लहान मुलांच्या तिकीट बुकिंग भाड्यावर महत्वाचे अपडेट्स, संबंधित नियम लक्षात ठेवा

IRCTC Railway Ticket

IRCTC Railway Ticket | जर तुम्हाला तुमच्या लहान मुलांसोबत ट्रेनने प्रवास करायचा असेल आणि मुलांची तिकिटं घ्यायची की नाही हे तुम्हाला समजत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

मुलांच्या ट्रेनच्या तिकिटांचा सध्याचा नियम काय आहे?
रेल्वेच्या वतीने तेथील प्रवाशांना मुलांच्या तिकिटातून सूट देण्यात येते. या सूटच्या नियमानुसार कोणत्याही प्रवाशाला आपल्या 5 वर्षाखालील मुलांसाठी तिकीट खरेदी करावे लागणार नाही. अशी मुले रेल्वेतून मोफत प्रवास करू शकतात. या नियमात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे. मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रेस ब्युरो ऑफ इंडियाचे (पीआयबी इंडिया) ट्विट रिट्विट केले असून, या नियमाशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या बातम्यांपासून सावध केले आहे.

मुलांच्या रेल्वे तिकिटाशी संबंधित नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केलं आहे. मुलांच्या रेल्वे तिकिटांशी संबंधित नियम बदलल्याचे वृत्त समोर आल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. आता भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करताना प्रवाशाला 1 ते 4 वर्षांपर्यंतच्या आपल्या मुलांसाठीही तिकीट खरेदी करावे लागणार आहे.

कोणत्या परिस्थितीत मुलांची तिकिटे खरेदी करावी लागतात :
* आपल्या मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा कमी आहे, परंतु आपल्याला त्याच्यासाठी स्वतंत्र जागा हवी आहे.
* अशावेळी आरक्षण फॉर्ममध्ये दिलेला पर्याय भरून मुलाची स्वतंत्र जागा घेता येते.
* अशात पालकांना आपल्या मुलाचं पूर्ण भाडं द्यावं लागणार आहे.
* हे भाडे कोणत्याही मोठ्या माणसासाठी आकारल्या जाणाऱ्या भाड्याएवढे असेल.
* हा नियम केवळ रिझर्व्हेशन बर्थ असलेल्या डब्यांसाठीच नव्हे तर चेअर कारसाठीही लागू असणार आहे.
* जर मुलाला वेगळी सीट नको असेल तर 5 वर्षाखालील मूल मोफत प्रवास करेल.
* मोफत प्रवास झाल्यास मुलासाठी स्वतंत्र आसन किंवा बर्थची मागणी करता येत नाही.
* असे मूल रिकाम्या सीटवर किंवा बर्थवर बसले असेल तर प्रवासी आल्यावर त्याला उचलून न्यावे लागेल.
* या नियमाशी संबंधित परिपत्रक रेल्वे मंत्रालयाने 6 मार्च 2020 रोजी जारी केले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IRCTC Railway Ticket for children’s check details 18 August 2022.

हॅशटॅग्स

#IRCTC Railway Ticket(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x