 
						Investment Scheme | सध्या जर तुम्ही LIC च्या एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या लेखात आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट योजना घेऊन आलो आहोत. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. एलआयसीच्या या विशेष योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला तब्बल 1 कोटी रुपयांचा परतावा मिळेल.
नेहमीच बँकांमध्ये जमा केलेले पैसे हवा तसा परतावा मिळवून देत नाहीत. अशा परिस्थितीत एलआयसीची एक खास योजना आपल्याला गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा देईल आणि ही योजना लोकांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. या योजनेअंतर्गत फक्त चार प्रीमियम भरून तुमची एक कोटीपर्यंतचा जबरदस्त लाभ परतावा मिळवू शकता. एलआयसीच्या या योजनेचे नाव ‘LIC शिरोमणी योजना’ आहे, या योजनेत गुंतवणुक केल्याने तुम्ही एक जबरदस्त परतावा मिळवू शकता.
आजारापणात सुरक्षा मिळवा :
एलआयसी लाइफ शिरोमणी योजना आजारपणासाठी सर्वोत्तम सुरक्षा देणारी योजना आहे. या योजनेचा मुदत कालावधी 4 स्तरांच्या श्रेणीमध्ये विभाजित करण्यात आला आहे.याचा मुदत कालावधी 14, 16, 18 आणि 20 वर्ष असेल. पॉलिसी घेणाऱ्याचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 55 वर्षे ठरवण्यात आले आहे. या योजनेंतर्गत किमान विमा सुरक्षा मूल्य 1 कोटी रुपये असेल. म्हणजे तुम्हाला एक कोटी रुपयांचा सुरक्षा कवच मिळेल.
नियमांनुसार, तुम्हाला या योजनेत किमान 4 वर्षांसाठी प्रीमियम जमा करणे आवश्यक आहे ज्यामध्ये पॉलिसीधारकाला कर्ज आणि जीवन सुरक्षा लाभ प्रदान केले जातील. या योजनेची खास वैशष्ट्ये अशी आहेत की तुम्हाला 14 वर्षांच्या पॉलिसीच्या कालावधीत 10 व्या आणि 12 व्या वर्षी मूळ विम्याच्या रकमेच्या 30 टक्के रक्कम परत दिली जाईल. 16 वर्षांच्या पॉलिसी मध्ये 12 व्या वर्षी मुदतीनंतर 14 वर्षे पूर्ण झाल्यावर 35 टक्के रक्कम परत दिली जाईल. 18 वर्षांच्या पॉलिसीचे 14 आणि 16 वे वर्ष पूर्ण झाल्यावर 40 टक्के रक्कम परत दिली जाईल. 20 पूर्ण झाल्यावर 16 व्या आणि 18 व्या वर्षाच्या पॉलिसी मध्ये अर्धांगवायूच्या आजरपणात मुदतीच्या वर्षातील 45 टक्के मूळ विम्याची रक्कम दिली जाईल.
आवश्यक कागदपत्र :
एलआयसीच्या जीवन शिरोमणी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्धांगवायू विभागात आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. अर्धांगवायूने ग्रस्त व्यक्तीने त्याचा/तिचा ओळखपत्र पुरावा सादर करावा, जन्मतारीख पुरावा देणे आवश्यक आहे, रहिवाशी पत्त्याचा पुरावा देणे आवश्यक आहे, छायाचित्र आणि धारकाचे बँक तपशील सादर करणे आवश्यक आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		