17 May 2024 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
x

Investment Tips | या लोकप्रिय सरकारी योजनेत पैसे होतात दुप्पट, बिनधास्त गुंतवणूक सुरू करा आणि निश्चिन्त राहा

Post office Scheme

Investment Tips | पोस्ट ऑफिसची लोकप्रिय योजना किसान विकास पत्रमध्ये, तुम्ही वार्षिक 6.9 टक्के दराने चक्रवाढ व्याजाचा फायदा घेऊ शकता.

पोस्ट ऑफिस स्कीम :
जर तुम्हाला दीर्घ मुदतीमध्ये हमखास परतावा हवा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस योजनांमध्ये बिनधास्त गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांवर, गुंतवणूकदारांना अनेक बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा खूप जास्त व्याज परतावा मिळत आहे. पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना, अशा जबरदस्त योजना आहेत, ज्यात तुम्हाला 7 टक्क्यांहून अधिक व्याज परतावा मिळू शकतो. त्याच वेळी, किसान विकास पत्र या लोकप्रिय योजनेमध्ये तुम्हाला वार्षिक 6.9 टक्के चक्रवाढ व्याजाचा फायदा होईल. किसान विकास पत्र योजनेत असे काय विशेष आहे, चला तर मग जाणून घेऊ

किसान विकास पत्र :
केव्हीपी ही एक अशी लोकप्रिय योजना आहे, जी काही काळात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करते. ही योजना प्रचलित व्याजदराने 10 वर्षे आणि 4 महिन्यांत म्हणजे 124 महिन्यात तुमची गुंतवणूक रक्कम दुप्पट करेल. तुम्ही समजा 1 लाख रुपये KVP योजनेत गुंतवणूक केली,तर पुढील 124 महिन्यांत तुमचे गुंतवणूक मूल्य 2 लाख रुपये होईल. KVP ठेवींवरील सध्याचा व्याज परतावा दर 6.9 टक्के आहे. अनेक बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा या योजनेत मिळणारा परतावा खूप जास्त आहे. या अल्पबचत योजनेच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांवर एक नजर टाकू

किमान आणि कमाल गुंतवणूक मर्यादा :
तुम्ही KVP मध्ये किमान 1000 रुपये आणि नंतर 100 रुपये च्या पटीत गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. तुम्ही हवे तेवढे खाते KVP योजनेत उघडू शकता.

मुदत पूर्ती कालावधी :
KVP अंतर्गत गुंतवणूक केलेली रक्कम वित्त मंत्रालयाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कालावधीनुसार परिपक्व होते. समजा तुम्ही आज गुंतवणूक केल्यास, तुमची गुंतवणूक 121 महिन्यांनंतर परिपक्व होईल. विशेष परिस्थितीत मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी दिली जाईल.

ट्रान्सफर :
समजा खातेदाराचा मृत्यू झाला तर, नामनिर्देशित किंवा जो कोणी कायदेशीर वारस असेल त्याला KVP खाते हस्तांतरित केले जाऊ शकते. या योजनेत न्यायालयाच्या आदेशाशिवाय योजना खाते कोणत्याही प्राधिकरणाला गोठवता येणार नाही. कायदेशीर वारसदाराला खात्याचे सर्व हक्क दिले जातील, आणि त्यावर कर्ज घेण्याची परवानगी दिली जाईल.

गुंतवणूकीचे फायदे :
पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेल्या KVP या लहान बचत योजना गुंतवणूकदारांना हमखास परताव्याची शाश्वती देतात. याशिवाय, PPF, SSY आणि SCSS सारख्या अनेक पोस्ट ऑफिस योजना बँकांच्या मुदत ठेवींच्या तुलनेत जास्त दराने व्याज परतावा देतात. सोबतच या योजनेत कर सवलत लाभ देखील दिले जातात. तथापि, जर तुम्हाला जोखीम घेण्याची भीती वाटत नसेल, तर तुम्ही म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स यांसारख्या बाजाराभिमुख योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस योजनेच्या तुलनेत येथे तुम्हाला जास्त परतावा आणि भरघोस पैसे मिळू शकतात. परंतु म्युच्युअल फंड किंवा स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही सखोल संशोधन करून आर्थिक सल्लागारासोबत चर्चा करणे आवश्यक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Tips Kisan vikas Patra investment opportunities and benefits on 27 August 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x