17 May 2024 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला
x

Filmfare Award 2022 | बॉलिवूड रोमँटिक कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर, फोटो व्हायरल

67th Filmfare Award 2022

67th Filmfare Award 2022 | बॉलिवूड मध्ये कतरिना कैफ आणि आणि विकी कौशलला रोमॅटिंक कपल म्हणून ओळखले जाते. नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डमध्ये पहिल्यांदाच या जोडप्याला रेड कार्पेटवर एकत्र पाहिले गेले. फिल्मफेअरमध्ये विकी कौशलला बेस्ट अ‍ॅक्टरचा अ‍ॅवॉर्ड देखील मिळाला आहे. यावेळी अभिनेती कतरिनाने विकीला किस केले, दरम्यान याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.

विकीला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मिळाला पुरस्कार, कतरिनाने केले किस
फिल्मफेअर पुरस्कारावेळी विकीचे नाव सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा नामांकनामध्ये पुकारल्यानंतर कतरिनाने विकीला किस केले आणि हा क्षण कॅमेरामॅनने टिपून घेतला. दरम्यान हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या अवॉर्ड शोवेळी रेड कार्पेटवर विक्कीने कतरिनाचे हिट सॉंग काला चष्मा देखील गायले. यावेळी विक्की कौशलला क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील प्रधान करण्यात आला आहे.

बेस्ट अ‍ॅक्टर अ‍ॅवॉर्ड
विकी कौशलला सरदार उधम सिंग या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी विकी अ‍ॅवॉर्ड ट्रॉफी घेऊन परत येताच कतरिनाने त्याच्या गालावर किस केले.

फिल्मफेअरमध्ये विकीचे स्पीच
यावेळी विकी म्हणाला की, माझ्या करिअर मधील ‘हा पहिला फिल्मफेअर पुरस्कार आहे हे माझ्या साठी आणि माझ्या परिवारासाठी खूप खास आहे. खरं तर सरदार उधम सिंग आपल्या सर्वांसाठी खूप खास चित्रपट ठरला आहे. शूजित दा यांचे मी मनापासून आभार मानतो. सरदार उधम सिंग या चित्रपटामधील माझा अभिनय आणि माझी भुमिका म्हणजे इरफान खान सरांना दिलेली श्रद्धांजली आहे.’पुढे विकी मंचावरून कतरिनाला सांगितले की, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आली आहेस.

रणवीरने जोडप्याचे केले कौतुक
पुरस्कार घेऊन खाली आल्यानंतर विकी कतरिनाजवळ बसताच रणवीर स्टेजवरून म्हणतो की, ओह गॉड ब्युटीफुल कपल, गॉड ब्लेस देम, गॉड ब्लेस देम.

फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डची विकीने इंस्टा स्टोरी पोस्ट केली,

दरम्यान, फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डमध्ये मिळालेल्या पुरस्काराबाबत विकीने त्याच्या पर्सनल इन्स्टाग्राम हॅडेलवर स्टोरीज आणि अनेक पोस्ट्सही शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये विकीने लिहिले की, ‘सरदार उधम चित्रपटाने 9 श्रेणींमध्ये यश मिळवले आहे. खास विजयासाठी सरदार उधम. 9 फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड, मिस यू शूजित सरकार दा.

विकी आणि कतरिना पर्सनल लाइफ :
9 डिसेंबर 2021 रोजी विकी आणि कतरिना लग्नाच्या बंधनामध्ये अडकले. लग्न होईपर्यंत दोघांनीही त्यांच्या नात्यासंबंधीत कोणताही खुलासा केला नाही. आणि लग्नानंतर या जोडप्याने त्यांचे अधिकृत फोटो पर्सनल हॅडलवर शेअर करून चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 67th Filmfare Award 2022 Checks details 1 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x