14 May 2024 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

Focused Mutual Funds | फोकस्ड म्युचुअल फंड म्हणजे काय?, यामध्ये SIP गुंतवणूक करून गुंतवणूकदार होतील मालामाल

Focused mutual fund

Focused Mutual Funds | फोकस्ड म्युच्युअल फंडांत गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे काही निवडक स्टॉक्समध्ये गुंतवले जातात. यामध्ये मिळणारा परतावा जबरदस्त असतो. पण धोकाही तेवढाच जास्त असतो. नवीन गुंतवणूकदारांना चुकीच्या योजनेत पैसे न लावण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या टिप्स:
जर तुम्हाला जबरदस्त गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची असेल किंवा मोठे आर्थिक उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास, म्युच्युअल फंड गुंतवणूक हा सर्वात जबरदस्त गुंतवणुकीचा मार्ग आहे. म्युच्युअल फंडात नियमित एसआयपी गुंतवणूक करा आणि दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक उद्दीष्ट ठेवा, तुम्हाला दीर्घकालीन चक्रवाढीचा लाभ मिळेल आणि तुम्हाला अनेक पट जास्त परतावा मिळेल. म्युचुअल फंड हे अनेक प्रकारचे असतत, त्यापैकीच एक आहे फोकस्ड म्युचुअल फंड.

या म्युचुअल फंडच्या माध्यमातून तुम्हाला 30 स्टॉकमध्ये गुंतवणूक करता येते. सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फोकस्ड म्युचुअल फंडाचा पैसा काही स्टॉकमध्ये गुंतवला जातो. या फंडाचे पैसे जास्तीत जास्त 30 शेअर्समध्ये गुंतवले जातात. तर, बहुतेक इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक केली जाते. काही योजनेत तर तुमचे पैसे 50 ते 100 स्टॉकमध्ये गुंतवले जातात. मल्टीकॅप फंडांप्रमाणे, फंड मॅनेजर तुमचे पैसे लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये कुठेही गुंतवू शकतात.

फोकस्ड म्युच्युअल फंड म्हणजे लक्ष्यित गुंतवणूक, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी निवडलेला स्टॉकचा समावेश असतो. गुंतवणूकदारांना येथे जबरदस्त परतावा मिळतो, परंतु यात जोखीम देखील जास्त असते. हे म्युचुअल फंड प्रामुख्याने दोन प्रकारचे असते. एका केंद्रित इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये, किमान 65 टक्के स्टॉकमध्ये गुंतवणूक केली जाते. फोकस्ड डेट मार्केटमधील डेट फंड मध्ये किमान 65 टक्के गुंतवणूक केली जाते.

कोणत्याही क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक करता येते :
या फोकस्ड म्युचुअल फंड योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोणत्याही क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक करता येते. फोकस्ड म्युचुअल फंडाचे फंड मॅनेजर तुमच्या गुंतवणूक धोरणानुसार तुमचे गुंतवणूक केलेले पैसे लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये कुठेही गुंतवू शकतात. या योजनेत बाजार भांडवल बाबत कोणतेही बंधन नाही. याशिवाय फंड मॅनेजर कोणत्याही सेक्टरचा स्टॉक गुंतवणूक करायला निवडू शकतो. कमाल स्टॉक मर्यादा 30 आहे. अशा परिस्थितीत, तो फार्मा, एफएमसीजी, केमिकल्स, आयटी, मेटल्ससह कोणत्याही क्षेत्रातील कोणतेही स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी निवडण्यास मोकळा आहे.

अधिक जोखमीसाठी तयार असेल तर :
नवीन गुंतवणूकदार फोकस्ड म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करणे टाळतात. म्युचुअल फंड तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर गुंतवणूकदार गुंतवणूक करताना अधिक जोखमीसाठी तयार असेल तर तो फोकस्ड म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतो आणि चांगला परतावा मिळवू शकतो. गुंतवणूकदार नवीन असेल तर त्याने जोखीम आणि धोका टाळावे. अनुभवानंतरच गुंतवणूकदारांनी फोकस्ड म्युचुअल फंड गुंतवणुकीसाठी निवडावा. कारण ते पूर्णपणे बाजाराच्या उलाढालीवर अवलंबून असते. अशा स्थितीत किमान 5 वर्षे गुंतवणूक करणे योग्य असेल. सेक्टर्स आणि स्टॉक्स हे लक्षात घेऊनच गुंतवणूक केली पाहिजे. अशा स्थितीत स्टॉकमध्ये चांगला फायदा होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Focused mutual fund investments benefits and return on investment on 6 September 2022.

हॅशटॅग्स

Focused mutual fund(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x