14 May 2024 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

Dreamfolks Share Price | ड्रीमफोल्क्सची शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री, शेअर्स 54 टक्के प्रीमियमवर शेअर बाजारात सूचीबद्ध

Dreamfolks Share Price

DreamFolks Share price| DreamFolks च्या IPO वर पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक जबरदस्त बातमी आली आहे. बाजारात सूचीबद्ध होताच कंपनीने गुंतवणूकदारांना धमाकेदार परतावा मिळवून दिला आहे.

DreamFolks services ltd शेअर किंमत :
DreamFolks IPO वर पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त बातमी आली आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध होताच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एक नंबर परतावा मिळवून दिला आहे. ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस लिलिमिटेडचे शेअर्स आज 54.96 टक्के प्रीमियमवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. प्राइस बँडच्या तुलनेत या कंपनीचे शेअर्स 179 रुपयांच्या वाढीसह 505 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.

सूचीबद्ध झाल्यानंतर शेअर्सचे भाव घसरतात :
लिस्टिंग झाल्यानंतर सुरुवातीच्या वेळात कंपनीच्या शेअर्समध्ये थोडीफार घसरण पाहायला मिळाली होती. ड्रीमफॉक्स सर्व्हिसेसचे शेअर्स सकाळी ट्रेडिंग सेशन सुरू झाल्यावर 492.50 रुपयांच्या पातळीवर जाऊन पोहोचले होते, यातील घसरण 2.48 टक्के होती. तथापि, या घसरणीनंतरही, कंपनीचे शेअर्स आयपीओ किमतीच्या तुलनेत 166.50 रुपये म्हणजेच 51.07 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.

प्री-ओपनिंग सेशन मधील ट्रेड :
ड्रीमफॉक्सचे शेअर्स सुरुवातीला प्री-ओपनिंग सेशनमध्ये जबरदस्त ट्रेड करत होते. शेअर बाजारात लिस्ट होण्यापूर्वी प्री-ओपनिंग सेशनमध्ये कंपनीचे शेअर्स 47 टक्क्यांच्या प्रीमियम किमतीवर जाऊन पोहोचले होते. शेअर्स वितरण केल्यानंतर ड्रीमफॉक्‍सचे शेअर्स ग्रे मार्केटमध्‍ये 100 रुपयांपेक्षा जास्त प्रिमियम किमतीवर जाऊन व्यवहार करू लागले.

कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 253 कोटी रुपये उभे केले होते. ड्रीमफॉक्स सर्व्हिसेसच्या IPO मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर म्हणजेच पात्र खरेदीदार संस्था यांचा कोटा 70.53 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत 43.66 पट अधिक बोली लावण्यात आली. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) कोट्यात 37.66 पट अधिक बोली लावण्यात आली होती. ड्रीमफॉक्स सर्व्हिसेसने IPO पूर्वी गुंतवणूकदारांकडून 253 कोटी रुपये उभारले होते. 24 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचा IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता.

कंपनीची आर्थिक स्थिती :
31 सप्टेंबर 2021 रोजी कंपनीची एकूण संपत्ती 64.7 कोटी रुपये नोंदवण्यात आली होती. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल 85.1 कोटी रुपये नोंदवण्यात आला होता. 2021 च्या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 105.6 कोटी रुपये महसूल मिळवला होता. आर्थिक वर्ष 2020 च्या तुलनेत हा महसूल कमी आहे. त्यानंतर कंपनीचा एकूण महसूल 367.04 कोटी रुपये नोंदवण्यात आला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Dreamfolks Share Price after IPO listing has increased on 7 September 2022

हॅशटॅग्स

#IPO(112)Dreamfolks Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x