
Flipkart Big Billion Days Sale | फ्लिपकार्ट आपल्या बिग बिलियन डेज सेल दरम्यान गुगल पिक्सल ६ ए स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट देणार आहे. ई-कॉमर्स कंपनीने हा गुगल स्मार्टफोन अवघ्या २७,६९९ रुपयांना विकण्याची घोषणा केली आहे. भारतात या फोनची किंमत सध्या 43,999 रुपये आहे. बातमी लिहिताना फ्लिपकार्टवर या फोनची किंमतही तितकीच आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल इव्हेंट २३ सप्टेंबरपासून सुरू होत असून हा इव्हेंट ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
अशा प्रकारे मिळतील ऑफर्स आणि डिस्काउंट
बिग बिलियन डेज सेल इव्हेंटदरम्यान फ्लिपकार्टने गुगल पिक्सल 6 ए फोन 34,199 रुपयांना विकण्याची घोषणा केली आहे. कंपनी या फोनची विक्री मूळ किंमतीपेक्षा ९,८०० रुपयांनी कमी किंमतीत करणार आहे. जे ग्राहक प्रीपेड ट्रान्झॅक्शनद्वारे खरेदी करतील त्यांना फ्लिपकार्ट पिक्सेल ६ ए स्मार्टफोनच्या खरेदीवर ३,५०० रुपयांची अतिरिक्त सूट देणार आहे. जर एखाद्या ग्राहकाने अॅक्सिस किंवा आयसीआयसीआय कार्ड्सचा वापर करून हा फोन खरेदी केला तर त्याला 3,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील दिली जाईल. सर्व ऑफर्स आणि डिस्काउंटची सांगड घालत फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल इव्हेंटदरम्यान गुगलच्या या फोनवर 16,300 रुपयांची सूट देणार आहे. सूट आणि खास ऑफर्ससह 43,999 रुपयांचा हा स्मार्टफोन फक्त 27,699 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
स्मार्टफोनचे फीचर्स :
Google Pixel 6a चा डिस्प्ले साइज 6.1 इंच आहे. यात १०८० पिक्सेलचे रिझॉल्यूशन असलेला ओएलईडी डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. या फोनच्या मध्यभागी एक होल पंच कापलेला आहे. गुगल पिक्सेल ६ ए या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ चे प्रोटेक्शन मिळते. यात इन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडर देखील आहे. या बायोमेट्रिक सेन्सरच्या मदतीने फोन अगदी सहज अनलॉक होतो. गुगल पिक्सेल ६ ए फोनमध्ये ६ जीबी एलपीडीडीआर ५ रॅम आणि १२८ जीबी यूएफएस ३.१ स्टोरेज आहे. स्वतंत्र स्टोरेज क्षमता वाढवता येत नाही.
अँड्रॉइड १२ ऑपरेटिंग सिस्टम :
पिक्सेल ६ ए हा फोन अँड्रॉइड १२ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. मात्र, हे पहिले अँड्रॉइड डिव्हाईस असून, अँड्रॉइड १३ चे अपडेट मिळणार आहे. तसेच 5 वर्षांपर्यंतची सुरक्षा अपडेटही दिली जात आहे. पिक्सेल ६ ए फोनमध्ये ड्युअल कॅमेरे आहेत. एफ १.७ हा ड्युअल-पिक्सेल ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह १२.२ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. पिक्सेल 6 फोनप्रमाणे या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पिक्सेल ६ ए मध्ये ४,४१० एमएएचची बॅटरी आहे. हे चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.