2 May 2024 9:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

मोदी सरकारवर टीका करताच ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचं भाषण थांबवलं

मुंबई : सरकारवर आणि सरकारी धोरणांविरूद्द टीका केल्याच्या कारणास्तव ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना त्यांचे भाषण अर्ध्यातच रोखण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. काल म्हणजे शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान पालेकरांच्या बाबतीत हा विचित्र प्रकार घडल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

पालेकरांनी त्यांच्या भाषणादरम्यान मोदी सरकारमधील केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एक निर्णयाविरोधात जोरदार टीकास्त्र करण्यास सुरुवात केली, त्यावेळेस सदर कार्यक्रमाच्या मॉडरेटरकडून त्यांना त्यांचे मत मांडण्यापासून रोखण्यात आल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे अमोल पालेकरांच्या भाषणादरम्यान, या मॉडरेटरनं त्यांना अनेकदा अडथळे करत रोखण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे त्यांना त्यांचं भाषण लवकर संपवण्यास सुद्धा सांगण्यात आलं, त्यामुळे अनेकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

शनिवारी अमोल पालेकर ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’द्वारे आयोजित कार्यक्रमास उपस्थितांना संबोधित करत होते. दरम्यान, सुप्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालेकर म्हणाले की, कशा पद्धतीने वर्तमान काळात आर्ट गॅलरींनी स्वतःचे स्वातंत्र्य गमावल आहे. तसेच, त्यांनी आर्ट गॅलरीच्या कामकाजाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

त्यावेळी, त्यांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या एका सल्लागार समितीचा देखील आवर्जून उल्लेख केला. या समितीमध्ये नेहमी स्थानिक कलाकारांचे सुद्धा प्रतिनिधित्व असायचे. मात्र, आता या समितीला थेट देशाच्या संस्कृती मंत्रालयाच्या नियंत्रणांतर्गत आणले गेल्याचे अमोल पालेकरांनी कार्यक्रमात सांगितले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x