
Penny Stocks | Valencia Nutrition Ltd च्या शेअर्सनी मागील 10 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. 5 सप्टेंबर 2022 रोजी Valencia Nutrition कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात 10.95 रुपये ट्रेडिंग किमतीवर बंद झाले होते. 19 सप्टेंबर रोजी शेअर 21.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, आणि 52 आठवड्यांचा एक नवीन उच्चांक तयार केला. या कालावधीत Valencia Nutrition च्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 94.05 टक्केचा भरघोस परतावा मिळवून दिला आहे. त्या तुलनेत सेन्सेक्समध्ये या काळात 0.72 टक्केची म्हणजेच 43 अंकांची घसरण पाहायला मिळाली होती. मागील पाच दिवसांत ह्या स्टॉकमध्ये 45.55 टक्के ची शानदार वाढ पाहायला मिळाली आहे.
दहा दिवसांपूर्वी जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक के लीअसती, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1.94 लाख रुपये झाले असते. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर 19.32 रुपये ट्रेडिंग किमतीवर बंद झाला होता. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये शेअरमध्ये 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता. बीएसई निर्देशांकावर कंपनीचे बाजार भांडवल 11.87 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. व्हॅलेन्सिया न्यूट्रिशन कंपनीचा स्टॉक 5 दिवस, 20 दिवस आणि 50 दिवसांच्या मुविंग सरासरीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे परंतु 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुविंग सरासरी किमतीपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे.
12 प्रमोटर्स कडे 35.67 लाख शेअर्स होल्ड :
शेअर्स होल्डिंग पॅटर्न नुसार मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 91 सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे व्हॅलेन्सिया न्यूट्रिशन कंपनीचे 36.12 टक्के शेअर्स आहेत, म्हणजेच त्यांनी एकूण 20.17 लाख शेअर्स होल्ड केले आहेत. मागील तिमाहीत कंपनीच्या 12 प्रमोटर्सकडे 63.88 टक्के वाटा म्हणजेच 35.67 लाख शेअर्स होल्ड आहेत. 60 सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे कंपनीचे एकूण 2.56 लाख शेअर्स होल्ड आहेत. 16 सार्वजनिक भागधारकांनी कंपनीचे एकूण 11.42 लाख शेअर्स होल्ड करून ठेवले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.