7 May 2024 11:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Hot Stocks | अप्रतिम परतावा देणारे 5 स्टॉक, फक्त 5 दिवसात दिला 93 टक्के परतावा, पैसा वाढवणाऱ्या शेअर्सची लिस्ट सेव्ह करा

Hot Stocks

Hot Stocks | अमेरिकन फेडरल रिझर्व्हने नुकताच व्याजदरात 75 बेसिस पॉईंट्सने वाढ केली, 23 सप्टेंबर पासून जागतिक बाजारात एक नकारात्मक लाट पसरली. नकारात्मक भावनांमुळे भारतीय बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांत सलग दुसऱ्या आठवड्यातही जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. डॉलरमध्ये कमालीची वाढ होत आहे, रुपया दररोज एक नवीन नीचांकी पातळी गाठत आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणुकदारानी विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. बँक ऑफ इंग्लंडनेही आपल्या व्याजदरात वाढ करून महागाई नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेच्या 10 वर्षांच्या बाँड मधील उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे, अश्या सर्व कारणामुळे जगातील सर्व शेअर बाजार पडले आहेत. मागील आठवड्यात, BSE सेन्सेक्समध्ये 741.87 अंकांनी म्हणजेच 1.26 टक्क्यांची पडझड झाली, आणि बाजार घसरणीसह 58,098.92 पॉइंट्सवर बंद झाला होता. निफ्टी 50 निर्देशांकात 203.55 अंकांची घसरण पाहायला मिळाली होती, त्याच्या घसरणीचे प्रमाण जवळपास 1.16 टक्के होते.निफ्टी 50 मागील आठवड्यात घसरणीसह 17,327.30 पॉइंट्सवर बंद झाला होता. अश्या पडझडीच्या काळातही शेअर बाजारात असे 5 स्टॉक आहेत, ज्यांनी फक्त 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 93 टक्क्यांचा मल्टी बॅगर नफा कमावून दिला आहे.

सोनल मर्कंटाइल :
सोनल मर्कंटाइल ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल सध्या 139.94 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यातील पहिल्या 5 ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या शेअरमध्ये 92.99 टक्क्यांची भरघोस वाढ नोंदवली गेली होती. हा स्टॉक मागील 5 दिवसांपूर्वी 49.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो आता वाढून 94.95 रुपयांपर्यंत गेला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या स्टॉक मध्ये 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता आणि या वाढीसह शेअर 94.95 रुपये किमतीवर बंद झाला. एकूण 92.99 टक्के परताव्यासह या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयेवर 1.93 लाख रुपये परतावा दिला आहे. नेहमी लक्षात ठेवा की स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे खूप जोखीमचे असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Kranex :
Kranex कंपनीने देखील मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. हा शेअर फक्त 16.30 रुपयांवर किमतीवर ट्रेड करत होता, तो सध्या 25.25 रुपयांवर ट्रेड करत आहे. गुंतवणूकदारांना या कंपनीच्या शेअर्समधे गुंतवणूक करून सुमारे 54.91 टक्के नफा झाला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 12.60 कोटी रुपये आहे. या स्मॉल कॅप कंपनीने मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 54.91 टक्के परतावा दिला आहे, जो FD सारख्या पर्यायांच्या दहा पट अधिक आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 19.71 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 25.20 रुपये किमतीवर क्लोज झाला.

कॅप्टन टेक्नोकास्ट:
कॅप्टन टेक्नोकास्टने आपल्या गुंतवणूकदारांना मागील आठवड्यात कमालीचा परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात या स्टॉक मध्ये 50 टक्के वाढ नोंदविण्यात आली होती. पाच दिवसांपूर्वी हा शेअर 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता तो सध्या 60 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजेच या स्टॉक मधून लोकांनी 50 टक्के अधिक नफा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 61.26 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 3.15 टक्के पडला होता, आणि 60 रुपयांवर क्लोज झाला होता.

इंटेक कॅपिटल :
भरघोस परतावा देणाऱ्या स्टॉकच्या यादीत इंटेक कॅपिटलचा ही समावेश आहे. या स्टॉकनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्याच्या सुरुवातीला हा शेअर 17.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो सध्या 26.10 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअर्समधून गुंतवणूकदारांनी फक्त पाच दिवसात 47.68 टक्के परतावा कमवला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 47.94 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या शेअरमध्ये 4.82 टक्क्यांची वाढ झाली होती, आणि हा वाढीसह शेअर 26.10 रुपये किमतीवर बंद झाला होता.

शरणम इन्फ्रा :
शरणम इन्फ्रा कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे. 0.91 पैसे वर ट्रेड करणारा हा स्टॉक आता वाढून 1.33 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून लोकांनी फक्त पाच दिवसात 46.15 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 6.65 कोटी रुपये नोंदवण्यात आले आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या शेअरमध्ये 4.72 टक्क्याची वाढ झाली होती, आणि त्यावेळी शेअर दिवसा अखेर 1.33 रुपये किमतीवर बंद झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Top 5 Hot Stocks which has given amazing return in just 5 days on 26 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x