28 April 2024 8:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Penny Stocks | 330 टक्के परतावा देणारा हा 12 रुपयांचा शेअर देशातील-विदेशातील गुंतवणूकदार खरेदी करत आहेत, स्टॉकचं नाव सेव्ह करा

penny Stock, gujrat high spin limited, FII investment, Micro cap share price, Stock market, BSE,NSE, equity shares,

Penny Stocks | भारतीय स्टॉक मार्केटमध्ये परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असते. अश्याच एका कंपनीत सिंगापूरस्थित परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार प्रसिद्ध एनएव्ही कॅपिटल व्हीसीसी-इमर्जिंग स्टार फंडने एका मायक्रो कॅप कंपनीत खूप मोठा हिस्सा खरेदी करून गुंतवणूक केली आहे. ह्या कंपनीचे नाव आहे, “गुजरात हाय स्पिन लिमिटेड”. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ह्या कंपनीत गुंतवणूक केली आहे, त्यामुळे स्टॉक मध्ये अचानक तेजी दिसून येत आहे.

FII ने केली 1.10 लाख शेअर्सची खरेदी :
22 सप्टेंबर 2022 रोजी FII ने गुजरात हाय स्पिन लिमिटेड या पेनी स्टॉकचे 1.10 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. BSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटा नुसार FII ने गुजरात हाय स्पिन लिमिटेड या कंपनीचे 1.10 लाख शेअर्स 11.40 रुपये प्रति शेअर या बाजारभावाने खरेदी केले आहेत. याचा अर्थ सिंगापूरस्थित या FII ने मायक्रो-कॅप कंपनीमध्ये सुमारे 12.54 लाखांची गुंतवणूक केली आहे.

गुजरात हाय स्पिन शेअरची किंमत :
BSE निर्देशांकावर सूचीबद्ध असलेला हा स्टॉक एका महिन्यापूर्वी 11.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या तो वाढून 12.95 रुपये पर्यंत गेला आहे. या वाढीमुळे भागधारकांनी स्टॉकच्या माध्यमातून 12 टक्के परतावा कमावला आहे. हा मायक्रो-कॅप स्टॉक मागील सहा महिन्यांपूर्वी 9.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, आता त्याची किंमत 12.95 रुपये प्रति शेअर झाली आहे. म्हणजेच या स्टॉकमध्ये मागील सहा महिन्यात तब्बल 30 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. एक वर्षापूर्वी ह्या पेनी स्टॉकची किंमत फक्त 7.86 रुपये होती, ज्यात वार्षिक दर वाढ प्रमाणे 65 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षभरात या पेनी स्टॉकमुळे भागधारकांनी आपल्या गुंतवलेल्या पैशावर दुप्पट परतावा कमावला आहे. या काळात स्टॉक 6.40 रुपये प्रति शेअर 12.95 रुपये प्रति शेअर्स या किमतीवर पोहोचला आहे.

उच्चांकी आणि नीचांकी किंमत :
मागील दोन वर्षांपूर्वी हा शेअर BSE निर्देशांकावर फक्त 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात आता 12.95 रुपये प्रति शेअर पर्यंत वाढ झाली आहे. या भरघोस वाढीमुळे भागधारकांनी ह्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून 330 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या मल्टीबॅगर पेनी स्टॉकचे बाजार भांडवल 21 कोटी रुपये नोंदवण्यात आले होते. आणि एकूण 10,000 शेअर्सचा व्यवहार एका दिवसात झाला होता. या शेअरचे पुस्तकी मूल्य 11.57 रुपये प्रति शेअर आहे. त्याची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी किंमत 13.50 रुपये असून 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 5.05 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Gujrat High Spin Limited shares Acquired by FII on 26 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x