4 May 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

Stocks To Buy | बँक किती वार्षिक व्याज देईल?, पण हा शेअर 44 टक्के परतावा देऊ शकतो, तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, नाव नोट करा

Stocks to Buy

Stocks To Buy | सध्या आपण पाहू शकतो की शेअर बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे. चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजार निर्देशांक सपाट झाला आहे. सुरुवातीला शेअर बाजारात पडझड झाली पण त्यानंतर थोडाफार सावरण्याचा प्रयत्न करत बाजार पुन्हा पडला. तथापि, शेवटच्या तासात वाढलेल्या विक्रीच्या दबावाने लोकांचा सर्व नफा काढून घेतला आणि बाजार दिवसा अखेर नकारात्मक अंकांवर बंद झाला. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 37.70 अंकांनी किंवा 0.07 टक्क्यांनी घसरून 57,107.52 अंकावर बंद झाला. निफ्टीमध्ये 8.90 अंकांनी किंवा 0.05 टक्क्यांची घसरण झाली आणि बाजार दिवसा अखेर 17,007.40 अंकावर बंद झाला. तज्ञांचे असे मत आहे की शेअर बाजारात पुढील काळात आणखी पडझड होण्याची शक्यता आहे. असा एक स्टॉक आहे जो शेअर बाजाराच्या पडझडीपासून दूर राहिला आहे.

आपण ज्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत त्याचे नाव आहे, “भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड”. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड सरकारी मालकीची कंपनी आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 55.95 रुपये किमतीवर बंद झाला होता. परंतु आयसीआयसीआय सिक्युरिटीजने या स्टॉक ची पुढील काळातील टारगेट किंमत 100 रुपये निर्धारित केली आहे. तज्ञांच्या आणि गुंतवणूकदारांच्या मते हा शेअर 100 रुपये पर्यंत वाढू शकतो. जर या शेअरमध्ये 55.95 रुपयेवरून 100 रुपयांपर्यंत वाढ झाली तर गुंतवणूकदारांना 46.05.टक्के मिळू शकतो. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही सरकारी मालकीची कंपनी आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच जिला आपण BHEL किंवा भेल म्हणूनही ओळखतो, ही भारतातील नवी दिल्ली स्थित एक अभियांत्रिकी आणि उत्पादन कंपनी आहे. ही कंपनी भारत सरकारच्या मालकीची एक अभियांत्रिकी आणि उत्पादन उपक्रम आहे. BHEL कंपनी भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. ह्या कंपनीची स्थापना 1956 साली करण्यात आली होती. BHEL भारतातील सर्वात मोठी वीज निर्मिती उपकरणे आणि मशीनचे उत्पादन करणारी कंपनी आहे.

BHEL कंपनी मुख्यतः
डिझाईन्स,अभियांत्रिकी,मशीन उत्पादन,पार्टस उत्पादन, मशीन चाचणी, अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्र जसे ऊर्जा, पारेषण, उद्योग, वाहतूक, अक्षय ऊर्जा, तेल आणि वायू आणि संरक्षण यांच्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी, प्रणाली आणि सेवा या उद्योगात गुंतलेली आहे. कंपनीच्या अखत्यारीत 16 उत्पादन केंद्र, 2 दुरुस्ती केंद्र, 4 प्रादेशिक कार्यालये, 8 सर्व्हिस सेंटर, 8 परकीय कार्यालये, 15 प्रादेशिक कार्यालय आणि 7 संयुक्त उपक्रमांचे नेटवर्क आहे.

स्टॉकची मागील काळातील कामगिरी :
BHEL चा स्टॉक मागील 5 दिवसात 6.67 टक्क्यांनी पडला आहे. मागील 1 महिन्यात स्टॉक सुमारे 5.5 टक्क्यांनी पडला आहे. मागील 6 महिन्यांत स्टॉकमध्ये 12.35 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. या वर्षी आतापर्यंत BHEL मध्ये 7.75 टक्क्यांची पडझड झाली होती. त्याच वेळी, मागील 1 वर्षात BHEL च्या स्टॉकमध्ये 7.60 टक्क्यांची घसरण झाली होती. मागील 5 वर्षांत BHEL चा स्टॉक 33.39 टक्क्यांनी पडला आहे. BHEL च्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 78.65 रुपये आहे, तर सध्या हा स्टॉक आपल्या नीचांकी पातळी किमतीवर म्हणजेच 41.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 19,482.14 कोटी रुपये आहे.

कंपनीचा तिमाही निकाल :
BHEL ने 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या जून तिमाहीत 8181.72 कोटी रुपयेच्या तुलनेत 30 जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत 4742.28 कोटी रुपये महसूल कमावला आहे. BHEL कंपनीने जून तिमाहीत 187.99 कोटी रुपयेचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने 912.47 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. सरकारी मालकीची कोल इंडिया लिमिटेड ही तीन सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसह भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड/BHEL, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड/ IOCL आणि GAIL इंडिया यांच्यासोबत चार पृष्ठभाग गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्यासाठी उद्योग करार करणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Government owned Company BHEL Stock to buy recommended by Experts on 28 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x