12 May 2025 2:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जाही काढणार: जेटली

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या दहशतवादी जैश-ए-मोहम्मदने गुरुवारी पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ७८ गाड्यांच्या ताफ्यावर भीषण दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ४२ भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी केंद्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला याविषयी अर्थमंत्री यांनी सांगितले. त्यानुसार भारत राजनैतिक पातळीवर पाकिस्तानवर बहिष्कार टाकणार असून, पाकिस्तानचा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा देखील काढून घेतला जाणार आहे. तसेच पाकसोबतचे इतर व्यापारी संबंध तोडण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. पुलवामा दहशतवादी हल्ला घडवणाऱ्यांना आणि त्यासाठी मदत करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा निर्धारच या बैठकीत करण्यात आला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Arun Jaitley(19)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या