5 May 2024 8:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Penny Stocks | 20 रुपयांच्या शेअरने 48,400 टक्क्यांचा तगडा परतावा दिला, स्टॉकमध्ये सुपर तेजीचे संकेत, शेअरचे नाव नोट करा

Penny Stocks

Penny Stocks | दीपक नायट्रेट या केमिकल कंपनीच्या स्टॉकने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या मल्टीबॅगर कंपनीचे शेअर्स मागील 10 वर्षांपूर्वी 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 2000 रुपयांपर्यंत गेले आहेत. दीपक नायट्रेटच्या शेअर्सनी दहा वर्षाच्या कालावधीत आपल्या भागधारकांना 9000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. दीपक नायट्रेट कंपनीमध्ये सरकारी विमा कंपनी LIC ची खूप मोठी गुंतवणूक आहे. LIC कडे दीपक नायट्रेट कंपनीचे 68 लाखांहून अधिक शेअर्स होल्ड आहेत. दीपक नायट्रेटच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3020 रुपये नोंदवण्यात आली आहे.

1 लाखाचे झाले 1 कोटींहून अधिक :
26 ऑक्टोबर 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/ BSE निर्देशांकावर दीपक नायट्रेटचे शेअर्स 19.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 2008.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी दीपक नायट्रेटच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.01 कोटी रुपये झाले असते. दीपक नायट्रेट शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1682.15 रुपये होती.

स्थापनेपासून आतापर्यंत दिला 48000 टक्के परतावा :
दीपक नायट्रेटच्या शेअर्सनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 48,400 टक्के नफा कमावून दिला आहे. 14 जुलै 1995 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE निर्देशांकावर 4.14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 सप्टेंबर 2022 रोजी दीपक नायट्रेट कंपनीचे शेअर्स बीएसईवर 2008.05 रुपयांच्या किंमत पातळीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही ह्या कंपनीत IPO च्या वेळी गुंतवणूक केली असती, आणि 1 लाख रुपये गुंतवले असते तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.85 कोटी रुपये झाले असते.

LIC ची एकूण गुंतवणूक :
भारत सरकारची सर्वात मोठी कंपनी LIC कडे दीपक नायट्राइट कंपनीचे 68.58 लाख शेअर्स होल्ड आहेत. LIC ने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी केमिकल कंपनी दीपक नाइट्राइटमधे आपला गुंतवणूक हिस्सा 5.028 टक्के वाढवला आहे. यापूर्वी, दीपक नायट्रेटमध्ये LIC ची एकूण हिस्सेदारी 4.977 टक्के होती, आणि LIC कडे दीपक नाइट्राइटचे एकूण 67,88,327 शेअर्स होते. पण आता LIC ने आपली गुंतवणूक वाढवली असून त्यांच्याकडे एकूण 68,58,414 शेअर्स आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Deepak Nitrate share price in focus check details on 1 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x