
Multibagger Stocks | भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक SBI ने मागील 30 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 29 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. SBI च्या शेअर्समध्ये खूप कमी कालावधीत 12 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. इतर PSU बँकांच्या तुलनेत SBI मध्ये कमालीची वाढ दिसून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया/SBI बँकिंग सुविधांसाठी सर्वात प्रसिद्ध आणि लोकांचा सर्वात जास्त विश्वास असलेली देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. SBI ने मागील 30 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 29 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, SBI चे बाजार भांडवल पाहिले तर, या सरकारी बँकेने 5 लाख कोटीचा टप्पा पार केला आहे. HDFC बँक आणि ICICI बँकेनंतर इतका मोठा बाजार भांडवल कमावणारी एसबीआय भारतातील तिसरी सर्वात मोठी बँक ठरली आहे.
मागील काही महिन्यात SBI च्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. आणि आनंदाची बातमी अशी की स्टॉक मध्ये अजूनही एक अपट्रेंड सुरू आहे. शेअर मार्केट तज्ज्ञांनी SBI स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 680 रुपयांची लक्ष किंमत ठरवली आहे. तज्ञांनी दिलेली लक्ष किंमत ही सध्याच्या किमतीपेक्षा 28 टक्के अधिक आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये SBI चे शेअर्स BSE निर्देशांकावर 531.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
भागधारकांनी कमावला 29 पट परतावा :
SBI च्या शेअर्समध्ये गुंतवणुकदार करणाऱ्या लोकांनी खूप कमी काळात कमालीचा नफा कमावला आहे. SBI चा स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या जवळ ट्रेड करत होता, पण गेल्या काही आठवड्यापासून स्टॉकमध्ये घसरण सुरू झाली आहे. की गुंतवणुकीची एक चांगली संधी आहे. 14 जुलै 1995 रोजी SBI चे शेअर्स 18.59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे सध्या 531.05 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. 30 वर्षांपेक्षा कमी कालावधीत ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 29 पट अधिक वाढवले आहेत. 15 सप्टेंबर 2022 रोजी SBI च्या शेअर्सने 578.65 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. मात्र, त्यानंतर शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढू लागला आणि प्रॉफिट बुकींग सुरू झाली. परिणाम स्वरूप स्टॉकची किंमत 531.05 रुपयांपर्यंत खाली पडली आहे.
SBI बँकेची पुढील वाटचाल पाहता बँक चांगल्या स्थितीत व्यापार आणि गुंतवणूक करत आहे. एसबीआयच्या बाजारपेठेतील भविष्यातील स्थितीबद्दल बोलताना, ब्रोकरेज फर्म KR चोक्सीचे तज्ञ म्हणतात की “एसबीआयची बँकिंग प्रणाली भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली बँकिग सिस्टीम आहे. त्यामुळे, इतर PSU बँकांच्या तुलनेत कोणत्याही अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी SBI बँक नेहमी तयार असते. ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे की SBI बँकचा नफा 29 टक्के CAGR च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-24 मध्ये 13 टक्के CAGR ने वाढेल. त्याच वेळी, शेअर विश्लेषकांचा अंदाज आहे की त्याचा ROA आर्थिक वर्ष 2024 पर्यंत 0.9 टक्के आणि ROE 15.1 टक्के पर्यात येईल. या सर्व कारणांमुळे, केआर चोक्सी फर्मने SBI बँक चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.आणि पुढील लक्ष्य किंमत 680 रुपये निश्चित केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.