
Multibagger Stocks | HBL पॉवर सिस्टीमचा स्टॉक मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून गुंतवणूकदारांच्या फोकस मध्ये आला आहे, कारण फक्त 3 ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 25 टक्क्यांपर्यंत वर गेला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सप्ताहाच्या शेवटी या शेअरमध्ये कमालीची उसळी पाहायला मिळाली होती. आज हा स्टॉक 11 टक्क्यांच्या वाढीसह 114.65 रुपयांच्या एका वर्षातील उच्चांक पातळी किमतीवर बंद झाला होता. या स्टॉकमध्ये मागील काही काळात मोठी खरेदी पाहायला मिळाली होती, त्यामुळे स्टॉक जबरदस्त तेजीत आल्याचे कळते. स्टॉकच्या किमतीसोबतच शेअरचे प्रमाणही वाढलेले दिसून आले आहे. मागील वर्षी हा स्टॉक 48 रुपयांच्या नीचांकी किंमत पातळीवर ट्रेड करत होता. यापूर्वी, HBL पॉवर सिस्टिमचा स्टॉक जून 2022 मध्ये एका दिवसात 14 टक्क्यांनी वर गेला होता.
जागतिक व्यापार :
कंपनीचा व्यवसाय अनेक देशांमध्ये विस्तारलेला आहे. HBL पॉवर ही भारतातील औद्योगिक बॅटरी बनवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक नावाजलेली कंपनी आहे. HBL पॉवर कंपनी दूरसंचार, UPS, रेल्वे, सौर, तेल आणि वायू आणि उर्जा उद्योग यासारख्या अनेक क्षेत्रांसाठी बॅटरीची निर्मिती करते. यामध्ये लीड-अॅसिड, ट्यूबलर जेल, शुद्ध शिसेची पातळ प्लेट आणि निकेल-कॅडमियम बॅटरीचा समावेश होतो. HBL पॉवरचा उद्योग युएसए, युरोप आणि मध्य पूर्वमध्ये 80 पेक्षा अधिक देशांमध्ये विस्तारलेला आहे. या कंपनीचे भारतात तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यात 6 उत्पादन केंद्र चालू आहेत.
शेअरचे मूल्य :
गेल्या दोन वर्षांपूर्वी हा शेअर 16 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. HBL पॉवर सिस्टम्स लिमिटेडने गेल्या दोन वर्षांत आपल्या शेअरधारकांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. कोरोना महामारीत शेअर बाजार कोसळल्यानंतर हा स्टॉक जबरदस्त पडला होता, पण त्याने कमालीची वापसी केली आणि स्टॉकमध्ये 700 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी 6 ऑक्टोबर 2020 रोजी हा शेअर 16.20 रुपये किमतीवर ट्रेड होता, त्यात कमालीची वाढ होऊन शेअर सध्या 114 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमची गुंतवणुक वाढून तुम्हाला 7 लाखांपेक्षा अधिक नफा मिळाला असता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.