10 May 2024 4:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Phantom Digital Effects IPO | व्हीएफएक्स कंपनीचा IPO बाजारात लाँच होणार, शेअरची इश्यू प्राईस 91 ते 95 रुपये, गुंतवणुकीची संधी

Phantom Digital Effects IPO

Phantom Digital Effects IPO | तुम्ही जर IPO मध्ये गुंतवणूक करून लिस्टिंग प्रॉफिट कमावण्याची संधी शोधत असाल तर, तुमच्यासाठी आणखी आनंदाची बातमी आहे. चेन्नई-स्थित क्रिएटिव्ह व्हिज्युअल इफेक्ट्स/VFXस्टुडिओ Phantom Digital Effects प्रसिद्ध कंपनी या आठवड्यात आपला IPO गुंतवणुकीसाठी बाजारात खुला करणार आहे.

IPO ओपनिंग :
The Phantom Digital Effects कंपनीचा IPO 12 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. तो 14 ऑक्टोबर 2022 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. ही कंपनी या NSE SME IPO द्वारे 29.10 कोटी रुपये जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे. Phantom Digital Effects IPO साठी किंमत बँड 91 रुपये ते 95 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊ या IPO चा सविस्तर तपशील

IPO चा सविस्तर तपशील :
Phantom Digital Effects चा IPO 12 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल, आणि तुम्ही 14 ऑक्टोबर 2022 पर्यंत यात पैसे गुंतवू शकता.
IPO चा आकार अंदाजे 29.10 कोटी रुपये असेल. म्हणजेच कंपनी 3,063,600 इक्विटी शेअर्स विक्रीसाठी बाजारात आणणार आहे.
IPO मध्ये इक्विटी शेअर्ससाठी किंमत बँड 91 रुपये ते 95 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
Phantom Digital Effects IPO NSE SME निर्देशांकावर सूचीबद्ध केले जातील.
या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा राखीव ठेवण्यात आला आहे. QIB साठी राखीव कोटा 50 टक्के आणि NII साठी राखीव कोटा 15 टक्के असेल.
या IPO मध्ये गुंतवणूकदार किमान 1 लॉटसाठी बोली लावू शकता. जास्तीत जास्त लॉट साठी बोली लावल्यास त्यात 1200 शेअर्स असतील. कमाल गुंतवणूक रक्कम मर्यादा 114,000 रुपयांची असेल.
IPO सूचीबद्ध झाल्यावर शेअर्सचे वितरण 19 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्ण होतील.
25 ऑक्टोबर 2022 रोजी IPO शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
Phantom Digital Effects कंपनी कोची, हैदराबाद, कोईम्बतूर आणि मदुराई या शहरात स्टुडिओ उभारण्याचा विचार करत आहे. चेन्नई आणि मुंबईतील सध्याच्या सुविधांच्या वाढवण्यावरही कंपनीने आपले लक्ष केंद्रित केले आहे. सध्या कंपनीचे स्टुडिओ 25,000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेले असून पुढील वर्षी मार्चपर्यंत स्टुडिओचा विस्तार 1 लाख चौरस फूट पर्यंत वाढवला जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Phantom Digital Effects IPO is ready to launch on stock market soon on 10 October 2022.

हॅशटॅग्स

Phantom Digital Effects IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x