30 April 2024 1:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Hot Stock | या शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, डबल कमाईची संधी, रेकॉर्ड तारीख नोट करून ठेवा

Hot Stock

Hot Stock | Easy Trip Planners या कंपनीने आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. Easy Trip Planners कंपनीने 10 ऑक्टोबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या कागदपत्रात माहिती दिली आहे की, संचालक मंडळाने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 3:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. याशिवाय, Easy Trip Planners कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचे 1:2 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्यासही मान्यता दिली आहे. या घोषणेनंतर, कंपनीच्या शेअर्समध्ये 4 टक्के पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली, आणि शेअरची किंमत 419 रुपयेवर पोहोचली होती.

स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्स :
कंपनी पुढील 2 महिन्यांत आपल्या पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात बोनस शेअर्स जमा करेल. Easy Trip Planners ने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की,” 10 ऑक्टोबर 2022 रोजी संचालक मंडळाची बैठक पार पडली होती, या बैठकीत, संचालक मंडळाने प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरचे 1 रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विट शेअर्समध्ये विभाजन करण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय, कंपनी एका इक्विटी शेअरसाठी 3 बोनस शेअर मोफत देणार आहे. संचालक मंडळाच्या अंतिम मंजुरीनंतर 2 महिन्यांच्या आत बोनस शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील.

शेअरची किंमत आणि कामगिरी :
Easy Trip Planners Limited कंपनीचे शेअर्स 105 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन स्टॉक सध्या 400 रुपये पेक्षा अधिक किमतीवर पोहोचला आहे. Easy Trip Planners Limited च्या शेअर्सनी मागील 19 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना मजबूत नफा कमावून दिला आहे. 19 मार्च 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/ BSE निर्देशांकावर 104.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या आठवड्याच्या सुरुवातीला 10 ऑक्टोबर 2022 रोजी Easy Trip Planners कंपनीचे शेअर BSE निर्देशांकावर 406.70 रुपये किमतीवर पोहोचले होते. त्याच वेळी, चालू वर्षात आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 52 टक्के परतावा मिळवून दिला आहे. Easy Trip Planners च्या शेअर्सने मागील एका वर्षात 38 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hot Stock Easy trip planner share price return on investment on 11 October 2022.

हॅशटॅग्स

#Hot Stock(315)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x