
Home on Rent | आपला भारत देश हा विकसनशील देश आहे. स्वप्नातील घर खरेदी करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे आपली ही इच्छा अनेक व्यक्ती भाड्याच्या घरात राहून पूर्ण करतात. भाडेतत्वार व्यक्ती घर, दुकान, पॉट अशा मालमत्ता भाड्ने वापरतात. यामध्ये भाडेकरू आणि मालक या दोघांमध्ये एक करार केला जातो. या कराराला रेंट ऍग्रीमेंट म्हणतात. हा करार फक्त त्या दोन व्यक्तींमध्ये केला जातो. याचा फायदा मालक आणि भाडेकरू अशा दोन्ही व्यक्तींना होत असतो. मात्र अनेक व्यक्ती थोडेसे पैसे वाचवण्यासाठी हा करार करणे टाळतात. परिणामी पुढे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
तर आता तुम्ही देखील भाड्याने राहत असाल, अथवा भाड्याने एखादी मालमत्ता तात्पूर्ती वापरण्याचा विचार करत असाल तर भाडेकराराचे नियम, फायदे तसेच हा करार न केल्यास होणारे तोटे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. या बातमीतून आज संपूर्ण भाडेकरार जाणून घेऊ.
मॉडेल टेनन्सी कायद्यानुसार :
केंद्र सरकारच्या मॉडेल टेनन्सी कायद्यानुसार भाडेकरूने आणि मालकाने भाडेकरारवर स्वक्षरी करणे अणिवार्य आहे. तसे न केल्यास कायद्याने दोन्ही व्यक्तींवर गुन्हा दाखल होऊ शकतो. भारतात रेंटल हाउसिंगची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हीच बाब लक्षात घेता आता अनेक राज्य फ्युचर अलाइन्ड पॉलिसी घेउन येण्याचा विचाक करत आहेत. यासाठी वेगवेगळी कामे देखील सुरु झाली आहेत. याचा दोन्ही व्यक्तींना जास्तीत जास्त फायदा कसा होइल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे.
काय आहे मॉडेल टेनन्सी कायदा
केंद्र सरकारने भारतात मॉडेल टेनन्सी कायदा लागू केला आहे. या कायद्याअंतर्गत भाडे करार करणे बंधणकारक केले आहे. यावर दोन्ही व्यक्तींची स्वाक्षरी असेल तरच हा करार करता येणार आहे. यामुळे भाडेकरारात अधिक पारदर्शकता येईल. यात मालमत्तेच्या भाड्याची रक्कम, कालावधी आशा पध्दतीचे अनेक नियम आहेत.
भाडेकरारातील महत्वाच्या बाबी
* भाडे करार करताना तोंडी करार किंवा भाडेपत्र बनवू नये.
* भाडे करार करताना दोन्ही व्यक्तींनी संबंधीत रक्कम भरावी.
* रक्कम भरणे टाळण्यासाठी तोंडी करार करू नये.
* तसे केल्यास पुढे येणा-या संकटाला दोघांना तोंड द्यावे लागते.
* उपनिबंधक कार्यालयात म्हणजेच सबरजिस्ट्रार ऑफिसमध्ये भाडेकरार नोंदणीकृत करणे वैध आहे.
* घरमालकाने स्टॅम्प पेपरवर तयार केले पाहिजेत.
* या स्टॅम्प पेपरवर दोघांची स्वाक्षरी झाल्यावर २ साक्षीदारांच्या उपस्थीतीत सबरजिस्ट्रार ऑफिसमध्ये नोंदणी होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.