
Multibagger Stocks | सध्या स्टॉक मार्केट मध्ये बोनस शेअर, स्टॉक स्प्लिट, आणि तिमाही परिणाम यांचा बोलबाला सुरू झाला आहे. अनेक कंपन्या स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्स जाहीर करत आहेत, याचा गुंतवणूकदाराना मजबूत फायदा होत आहे. जर तुम्हीही स्टॉक स्प्लिट चा फायदा घेऊ इच्छित असाल तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला एका मल्टीबॅगर बद्दल माहिती देणार आहोत, ज्याने शेअर धारकांना मजबूत परतावा तर दिला आहेच, सोबत आता स्टॉक स्प्लिटचीही घोषणा केली आहे. आपण ज्या कंपनीबद्दल माहिती घेत आहोत, तिचे नाव आहे,”Axita कॉटन”. Axita कॉटन कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली, त्यात संचालक आणि सदस्यांनी स्टॉक स्प्लिटचा प्रस्ताव पारित केला आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक स्प्लिटबद्दल
स्टॉक स्प्लिट प्रमाण :
Axita कॉटन कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीमध्ये कळवले आहे की, कंपनीने स्टॉक स्प्लिटचा प्रस्ताव पारित केला असून, त्यात एक विद्यमान शेअर 10 शेअर्समध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये असून त्याला 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअर्स मध्ये विभागले जाईल. या स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने 21 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निर्धारित केली आहे. म्हणजेच 21 ऑक्टोबरपर्यंत ज्या गुंतवणूकदाराकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना स्टॉक स्प्लिटचा लाभ होणार आहे.
कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
अॅक्सिटा कॉटन कंपनीचे शेअर मागील महिन्यात 20 टक्के पडले आहेत. यादरम्यान कंपनीच्या शेअरची किंमत 310 रुपयेवरून 370 रुपयांवर आली आहे. मागील 6 महिन्यांपूर्वी या कंपनीचा शेअर 120 रुपयेवर ट्रेड करत होता. मागील 6 महिन्यांत या स्टॉकमध्ये 200 टक्क्याची मजबूत वाढ झाली होती. त्याचवेळी, चालू वर्ष 2022 मध्ये अॅक्सिटा कॉटनच्या शेअरची किंमत 335 टक्क्यांनी वधारले आहे. एक वर्षभरापूर्वी या कंपनीचा शेअर 40 रुपयेवर ट्रेड करत होता, तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरने मध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांनी 800 टक्क्यांचा नफा कमावला आहे.
उच्चांकी आणि नीचांकी किंमत :
11 जानेवारी 2019 रोजी Axita कॉटन कंपनीचा शेअर 21 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या हा स्टॉक 370 रुपयेवर पोहोचला आहे. म्हणजेच या कालावधीत दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 1700 टक्केचा मल्टीबॅगर नफा झाला आहे. कंपनीची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 397.55 आहे. त्याचवेळी 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 40.67 रुपये होती. कंपनीचे बाजार भांडवल 366 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.