
Penny Stocks | सध्या शेअर बाजारात पडझडीचे वातावरण असतानाही काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत बोनस देत आहेत. आता बोनस देणाऱ्या कंपनीच्या यादीत रिजन्सी फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीचा देखील समावेश झाला आहे. “रिजन्सी फिनकॉर्प लिमिटेड” कंपनीचे बाजार भांडवल 6.24 कोटी रुपये आहे. या कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअरसाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊ, कंपनीच्या शेअरची कामगिरी आणि बोनस शेअर्सचे प्रमाण
कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिजन्सी फिनकॉर्प लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला आणि शेअरची किंमत 11.68 रुपये पर्यंत पोहोचली होती. 5 वर्षांपूर्वी जर तुम्ही या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती तर सध्या तुमचे गुंतवणूक मूल्य 62.98 टक्के कमी झाले असते. ज्या लोकांनी 3 वर्षांपूर्वी या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना सध्याच्या किमती नुसार 61.64 टक्क्यांचा तोटा झाला असता. मागील वर्षभरात या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. या दरम्यान शेअरच्या किंमतीत 16.80 टक्क्यांची भरघोस वाढ पाहायला मिळाली आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून हा स्टॉक पुन्हा एकदा घसरू लागला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 14.85 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 6.15 रुपये होती.
बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख :
रिजन्सी फिनकॉर्प लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, “10 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीने संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख 21 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.