 
						Hot Stocks | खाजगी क्षेत्रातील फेडरल बँकेचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह मजबूत ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये कालच्या ट्रेडिंग सेशन दरम्यान मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवली गेली होती. फेडरल बँकेचे शेअर्स इंट्राडे ट्रेडमध्ये 132.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर स्टॉकमध्ये थोडा विक्रीचा दबाव दिसून आला होता, मात्र शेवटी त्यात 5 टक्के वाढ होऊन स्टॉक 130.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या स्टॉकमधे अचानक आलेली ही तेजी सप्टेंबर 2022 च्या तिमाहीतील उत्कृष्ट निकालामुळे पाहायला मिळाली होती.
कंपनीचा व्यापार :
सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत फेडरल बँकेचा निव्वळ नफा स्टँडअलोन आधारावर 52.89 टक्क्यांनी वाढला असून 703.71 कोटी रुपयेवर गेला आहे. बुडित कर्जासाठी तरतूद कमी केल्यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे, असा तज्ञांचा अंदाज आहे. मागील वर्षी 2021 च्या याच तिमाहीत फेडरल बँकेने 460.26 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.
कंपनीच्या कमाईत वाढ :
फेडरल बॅंकेने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत फेडरल बँकेचे एकूण उत्पन्न 4,630.30 कोटी रुपये वाढले आहे. मागील वर्षी याच कंपनीने 3,870.90 कोटी रुपये महसूल नोंदवला होता.
बँकेच्या NPA मध्ये घट :
सप्टेंबर 2022 तिमाहीच्या शेवटी फेडरल बँकेची ढोबळ अनुत्पादित मालमत्ता म्हणजेच बुडीत कर्जे 2.46 टक्क्यांनी कमी झाले आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये फेडरल बँकेचा NPA 3.24 टक्के राहिला होता. फेडरल बँकेचा सकल NPA 2021 या वर्षात वर्षी 4,445.84 कोटी रुपये होता. फेडरल बँकेचा निव्वळ NPA 0.78 टक्के म्हणजेच 1,262.35 कोटी रुपये आहे. 2021 मध्ये फेडरल बँकेचा निव्वळ NPA / बुडित कर्ज 1.12 टक्के म्हणजेच जवळपास 1,502.44 कोटी रुपये होता. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत फेडरल बँकेचे बुडीत कर्जे किंवा आकस्मिक परिस्थितींसाठी राखीव ठेवलेला फंड कमी होऊन 267.86 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी 2021 मध्ये सप्टेंबर तिमाहीत बुडीत कर्जे किंवा आकस्मिक परिस्थितींसाठी राखीव ठेवलेला फंड 292.62 कोटी रुपये होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		