18 May 2024 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Amul Milk Rates Hike | निवडणुकीच्या तोंडावर गुजरात वगळून अमूलने देशभरात दुधाचे दर वाढवले, किती वाढ झाली पहा

Amul Milk Rates Hike

Amul Milk Rates Hike | सणासुदीच्या काळात अमूलनं पुन्हा एकदा दरवाढ करत सर्वसामान्यांना मोठा दणका दिला आहे. अमूलने दुधाचे दर वाढवल्याची ही वर्षभरातली तिसरी वेळ आहे. गुजरात वगळता संपूर्ण देशात आजपासून हे वाढीव दर लागू झाले आहेत. कंपनीच्या या निर्णयानंतर अमूलचं फुल क्रीम दूध आणि म्हशीचं दूध प्रतिलिटर 2 रुपयांनी महागणार आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे एमडी सोढी यांनी वाढीव किंमती जाहीर केल्या.

गुजरातमध्ये दरवाढ लागू होणार नाही
‘अमूल’ने गुजरात वगळता इतर सर्व राज्यांमध्ये फुल क्रीम दूध आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. या निर्णयानंतर फुल क्रीम दुधाचा भाव ६१ रुपयांवरून ६३ रुपये आणि म्हशीच्या दुधाचा दर ६३ रुपयांवरून ६५ रुपये प्रति लिटर झाला आहे. अमूलने यंदा दुधाच्या दरात सहा रुपयांची वाढ केली आहे.

या वर्षी भावात ६ रुपयांची वाढ झाली आहे
अमूलच्या दुधात ही वाढ अचानक झाली आहे. आज सकाळी लोकांना वाढीव दरात दूध मिळालं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात चाऱ्याचा महागाई दर २५.२३ टक्के राहिला असून, गेल्या वर्षी याच महिन्यात तो २०.५७ टक्के होता. त्याचबरोबर चाऱ्याचा महागाई दर यंदा ऑगस्टमध्ये 25.54% च्या पातळीवर पोहोचला, जो 9 वर्षांतील उच्चांक आहे. आकडेवारीनुसार, घाऊक महागाई ऑगस्टमध्ये १२.४१ टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये १०.७ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. त्याचबरोबर अन्नधान्य चलनवाढीचा दर 9.93 टक्क्यांवरून 8.08 टक्क्यांवर आला आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात अमूलने ऑपरेशन कॉस्ट आणि दूध उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे कारण देत दुधाचे दर वाढवले होते, तर मार्चमध्ये कंपनीने वाहतूक खर्चाचे कारण देत दुधाच्या दरात वाढ केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Amul Milk Rates Hike in India check details 15 October 2022.

हॅशटॅग्स

#Amul Milk Rates Hike(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x