7 May 2025 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

Stock in Focus | या कंपनीचा शेअर 50 रुपयांवरून फक्त 3 रुपयांवर आला आहे, आता स्वस्त झाल्याने हा शेअर खरेदी करावा का?

Stock in Focus

Stock In Focus | 2022 हा वर्ष शेअर बाजारासाठी फार नकारात्मक राहिला होता. बहुतेक शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे बुडवले आहेत. तथापि, काही शेअर्स आहेत ज्यांनी लोकांना मालामाल ही केले आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला एका अशा स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने 2022 या वर्षात आतापर्यंत गुंतवणूकदारांचे 92 टक्के पैसे बुडवले आहे. दर वार्षिक वाढीच्या दरानुसार हा स्टॉक 50 रुपयांवरून 3.60 रुपयांपर्यंत खाली पडला आहे. हा स्टॉक BSE-NSE निर्देशांकात 10 ऑक्टोबर रोजी शेवटचा ट्रेड झाला होता. सध्या त्याची ट्रेडिंग बंद करण्यात आली आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहेत, त्याचे नाव आहे, “फ्युचर रिटेल”.

फ्युचर ग्रुपमधील फ्युचर रिटेल कंपनीचा हा स्टॉक यावर्षी सातत्याने घसरत आहे. यामुळे ज्या लोकांनी आतापर्यंत त्यात आपली गुंतवणूक कायम ठेवली होती, त्यांना प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. 3 जानेवारी 2022 रोजी हा शेअर NSE निर्देशांकात 50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत या स्टॉकमध्ये 92 टक्के पेक्षा अधिक पडझड होऊन स्टॉक सध्या 3.60 रुपयांवर आला आहे. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदारानी या वर्षाच्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 7,200 रुपयांवर आले आहेत.

स्टॉकमध्ये घसरण होण्याचे कारण :
फ्युचर रिटेल ही कंपनी प्रचंड मोठ्या कर्जाच्या बोज्याखाली दबली आहे. कर्जबाजारी झालेली ही कंपनी मागील काही वर्षांपासून सातत्याने वादात अडकली असल्याचे दिसून येते. Amazon सोबत सुरू असलेल्या वादामुळे फ्युचर रिटेलने 5,322.32 कोटी रुपये कर्ज परतफेड केले नाही. मार्चमध्ये, बँक ऑफ इंडियाने सार्वजनिक नोटीसद्वारे FRL च्या मालमत्तेवर दावा केला होता. किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील फ्युचर ग्रुपची प्रमुख कंपनी फ्युचर रिटेल आता त्यांच्या कर्जदारांद्वारे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात दाखल केलेल्या दिवाळखोरीच्या कायदेशीर कारवाईला सामोरे जात आहे. कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात किशोर बियाणी, राकेश बियाणी, राहुल गर्ग, रवींद्र धारिवाल, गगन सिंग आणि जेकब मॅथ्यू हे लोक सामील आहेत.

फ्युचर रिटेलचा वाद थोडक्यात :
खरं तर, 2019 मध्ये Amazon ने Future Coupons कंपनीत 49 टक्के शेअर्स खरेदी करून गुंतवणूक वाढवली. Future Coupons ही फ्यूचर ग्रुपची होल्डिंग कंपनी आहे. Amazon ने ही गुंतवणुक 1500 कोटी रुपयांत केली होती. या करारानुसार, अॅमेझॉनला 3 ते 10 वर्षांच्या आत फ्यूचर रिटेलमधील भागभांडवल पूर्णपणे खरेदी करण्याचा अधिकार देण्यात आला होता. परंतु 2020 मध्ये, फ्यूचर ग्रुपने आपला किरकोळ, घाऊक आणि लॉजिस्टिक व्यवसाय मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलला 24,713 कोटी रुपये मध्ये विकण्याची घोषणा केली. तेव्हापासून अॅमेझॉन, फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स रिटेल यांच्यात वाद सुरू झाला होता, आणि स्टॉक पडायला सुरुवात झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock of Future group retail chain company Future retail is in focus of Investors on 17 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या