
Multibagger Stocks | कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक ही मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीतील स्मॉल कॅप कंपनी आहे. हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कामावून दिला आहे. गुंतवणूकदारांना श्रीमंत केल्यानंतर आता या कंपनीचे शेअर्स विभाजित केले जाणार आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीचे शेअर्स कोणत्या प्रमाणात स्प्लिट केले जातील?
स्टॉक विभाजनाचा तपशील :
कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या अहवालात कळवले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत स्टॉक स्प्लिट करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या स्टॉक स्प्लिटनंतर, 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले कंपनीचे शेअर्स 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्समध्ये विभागले जातील. “सोप्या शब्दात सांगायचे झाले तर हा कंपनीचा एक शेअर 5 शेअर्समध्ये विभागला जाईल. कंपनीच्या संचालक मंडळाने 3 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे.
शेअर बाजारात कंपनीची कामगिरी :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे शेअर्स 4.99 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर कंपनीच शेअर 399.85 रुपये किमत पातळीवर जाऊन झाला होता. 25 जून 2018 रोजी या कंपनीचा शेअर 12.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 3098.80 टक्क्याची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. 26 ऑक्टोबर 2021 रोजी या कंपनीचा शेअर 47.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गेल्या एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 748.94 टक्के परतावा कमावून दिला आहे.
16 फेब्रुवारी 2022 रोजी कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक कंपनीचा शेअर 72.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरची किमती 448.90 टक्क्यांनी वधारली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या स्टॉक धारकांना 221 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचबरोबर या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी शुक्रवारपर्यंत 21.52 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीच्या प्रमोटर्सकडे 61.87 टक्के शेअर होल्डिंग आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडे या कंपनीची एकूण 38.13 टक्के होल्डिंग आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.