
Stocks To Buy | खाजगी क्षेत्रातील IndusInd Bank च्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी येऊ शकते, असे संकेत दिसत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञ या बँकिंग स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत इंडसइंड बँकेने 1787 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. मागील वर्षीच्या तिसऱ्या तिमाही कालावधीत इंडसइंड बँकेच्या नफ्यात 60 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. इंडसइंड बँकेचे शेअर पुढे येणाऱ्या काळात 1500 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. 20 ऑक्टोबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर इंडसइंड बँकेचे शेअर्स 4 टक्के घसरणीसह 1171.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
पुढील लक्ष किंमत :
जागतिक ब्रोकरेज फर्म Jefferies ने IndusInd बँकेच्या शेअर्सवर “बाय” रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या खाजगी क्षेत्रातील बँकेसाठी 1530 रुपये लक्ष्य किंमत निर्धारित केली आहे. ब्रोकरेज फर्मने यापूर्वीही इंडसइंड बँकेच्या शेअर्ससाठी 1330 रुपयांचे लक्ष्य ठेवले होती, आणि स्टॉकने ती अल्पावधीत साध्य केली होती. उच्च उत्पन्न आणि कमी NPA मुळे सप्टेंबर 2022 तिमाहीत बँकेच्या नफ्यात वार्षिक 60 टक्के वाढ दिसून आली आहे.
शेअरची कामगिरी :
चालू वर्षात स्टॉक आतापर्यंत शेअर्समध्ये 30 टक्के वाढला आहे. इंडसइंड बँकेच्या शेअर्सनी चालू वर्षात आतापर्यंत 30 टक्के पेक्षा अधिक वाढ नोंदवली आहे. 3 जानेवारी 2022 रोजी BSE निर्देशांकावर इंडसइंड बँकेचे शेअर्स 912.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स सध्या 1171.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये 21 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत इंडसइंड बँकेचा टोटल प्रोविजंस 1141 कोटी रुपये होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत 33 टक्के कमी आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.