
Money From Shares| या वर्षी दिवाळीपूर्वी अनेक लहान मोठ्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस आणि डिव्हिडंड जाहीर केले होते. त्यातही अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी दिवाळीनंतर आपल्या गुंतवणूकदारांना सरप्राईज गिफ्ट देण्याची योजना आखली आहे. आयटी कंपनी टेक महिंद्रा त्यापैकी एक आहे. 1 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीच्या गुंतवणूकदारांना सरप्राईज गिफ्ट मिळेल, अशी शक्यता आहे. स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कंपनीने कळवले आहे की, 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे, त्यात काही निर्णय घेतले जाऊ शकतात.
कंपनीने दिलेली माहिती :
कंपनीने स्टॉक मार्केट नियामकांना माहिती दिली आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीकडून त्रैमासिक आकडेवारी जाहीर केली जाईल, तसेच आर्थिक वर्ष 2023 च्या अंतरिम लाभांशावरही सभासद चर्चा आणि मतदान करतील. कंपनी त्याच दिवशी अंतरिम लाभांश जाहीर करेल अशी शक्यता आहे. कंपनीच्या वतीने गुंतवणूकदारांना मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत 900 टक्के म्हणजेच सुमारे 45 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्यात आला होता.
टेक महिंद्रा कंपनीने या अंतरिम लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 10 नोव्हेंबर 2022 हा दिवस निश्चित केला आहे. 31 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनी एक्स-डिव्हिडंड वर ट्रेड करेल. BSE वर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टेक महिंद्रा कंपनीचे शेअर्स 1041.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. कंपनीचे बाजार भांडवल 1.01 लाख कोटी रुपये आहे.
गेल्या वर्षभरात कंपनीची कामगिरी :
मागील एक वर्षात शेअर बाजाराची कामगिरी गुंतवणूकदारांसाठी अत्यंत निराशाजनक आणि अस्थिर होती. या काळात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 31.38 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती. त्याच वेळी, या वर्षाच्या सुरुवातीला ज्या लोकांनी गुंतवणूक केली होती, त्यांच्या शेअरच्या मूल्यात 41 टक्क्यांची पडझड पाहायला मिळत आहे. मागील 6 महिन्यांत टेक महिंद्रा कंपनीच्या शेअरमध्ये 18 टक्क्यांहून जास्त कमजोरी पाहायला मिळाली होती. गुंतवणूकदारांसाठी एक चांगली गोष्ट म्हणजेमागील एका महिन्यात स्टॉक 0.30 टक्क्यांनी वाढला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.