10 May 2025 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Total Gas Share Price | तज्ज्ञांकडून BUY कॉल, अदानी टोटल गॅस शेअर फोकसमध्ये, अपडेट नोट करा - NSE: ATGL Adani Green Share Price | 30 टक्के कमाईची संधी, या मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ADANIGREEN Adani Energy Solutions Share Price | 58% परतावा मिळेल, सुवर्ण संधी, अदानी ग्रुपचा शेअर खरेदी करा - NSE: ADANIENSOL Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअर्ससाठी BUY रेटिंग, संधी सोडू नका, मिळेल मोठा परतावा - NSE: ADANIPORTS Adani Enterprises Share Price | 40% अपसाईड तेजीचे संकेत, अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार - NSE: ADANIENT Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Quick Money Share | फक्त पैसा आणि पैसा, केवळ 5 दिवसात 108 टक्क्यांपर्यंत परतावा देणारे 5 शेअर्स, लिस्ट सेव्ह करा

Quick Money Shares

Quick Money Share | सकारात्मक जागतिक संकेत आणि तिमाहीत सकारात्मक कॉर्पोरेट निकाल यामुळे 21 ऑक्टोबर 2022 रोजी आठवड्याच्या शेवटी शेअर बाजाराने चांगली वाढ नोंदवली होती. मागील आठवड्यात गुंतवणूकदारांचे नुकसान झाले होते, ते भरून निघाले आहे. मेटल सेक्टर वगळता, बहुतेक सर्व क्षेत्रांनी तेजी नोंदवली होती. या तेजीत PSU बँक 11 टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर ट्रेड करत होते. आठवड्याभरात सेन्सेक्समध्ये जवळपास 1,400 अंकांची म्हणजेच 2.4 टक्क्यांची वाढ झाली असून सेन्सेक्स 59,307 वर ट्रेड करत होता. आणि निफ्टीमध्ये 400 अंकांची म्हणजेच 2.3 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,576 वर ट्रेड करत होता. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात अनुक्रमे अर्धा टक्के आणि 1.5 टक्‍क्‍यांची वाढ पाहायला मिळाली होती. असे 5 शेअर्स आहेत, ज्यांनी मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणूकदारांना 108 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांत गुंतवणूकदारांना दुप्पट नफा मिळाला आहे.

K&R Rail Engineering:
K&R Rail Engineering ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 86.08 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यातील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 108.6 टक्क्यांनी वधारला आहे. हा स्टॉक मागील 5 दिवसांत 26.15 रुपयांवरून 54.55 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 54.55 रुपयांवर क्लोज झाला होता. गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणूकीवर 108.6 टक्के परतावा मिळाला आहे. यात लोकांना एक लाख रुपये गुंतवणूक करून 2.08 लाखांपेक्षा जास्त नफा मिळाला आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे खूप जोखमीचे असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

कंटेनर टेक्नॉलॉजी :
कंटेनर टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने ही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचा शेअर 21.70 रुपयांवरून वाढून 43.30 रुपयांवर ट्रेड करत आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना या कंपनीच्या शेअर्सन 99.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 27.04 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसात मिळालेला 99.54 टक्के परतावा हा FD सारख्या इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 10 टक्क्यांच्या उसळीसह 43.30 रुपयांवर क्लोज झाला होता.

गोकुळ ऍग्रो :
प्रचंड परतावा कमावून देणाऱ्या स्टॉकमध्ये गोकुळ ऍग्रोही पुढे आहे. मागील आठवड्यात या स्टॉकने आपल्या भागधारकांना 70.77 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा शेअर 81.25 रुपयांवरून वाढून 138.75 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या समभागातून गुंतवणूकदारांनी 70.77 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीचे नजर भांडवल 1,985.13 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 8.57 टक्क्यांच्या वाढीसह 138.75 रुपयांवर क्लोज झाला होता.

टिप्स फिल्म्स :
टिप्स फिल्म्स कंपनीनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा कमावून दिला आहे. हा शेअर 318 रुपयांवरून 524.95 रुपयांवर पोहचला आहे. या शेअर मधून गुंतवणूकदारांनी 65.08 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 226.93 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 19.20 टक्क्यांच्या उसळीसह 524.95 रुपयांवर क्लोज झाला होता.

श्री कृष्णा इन्फ्रा :
श्रीकृष्ण इन्फ्रा कंपनीनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. हा शेअर 13.46 रुपयांवरून 21 रुपयांवर गेला आहे. म्हणजेच या शेअरमध्ये पैसे लावून गुंतवणूकदारांनी 56.02 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 6.30 कोटी रुपये आहे. गेल्या आठवड्यात या शेअरमध्ये 9.38 टक्क्यांची वाढ झाली होती, आणि स्टॉक 21 रुपयांवर क्लोज झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Shares giving Multibagger returns in short time on 25 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या