
ATM Money Withdrawal | आज प्रत्येक शहरा पावलापावलावर एटिएम सेवा उपलबध्द आहे. आप्याला पगाराचे किंवा इतर कोणतेही पैसे काढायचे असल्यास आपण एटिएमचा वापर करतो. अनेक वेळ नागरिकांना घाईत असताना बॅंकेत रांग लावून पैसे मिळवणे शक्य नसते त्यामुळेच एटिएम सेवा सुरू करण्यात आली आहे. यात तुम्हाला जेव्हा केव्हा पैसे हवे असतील तेव्हा तुम्ही ते काढू शकता.
दिवसातील २४ तास एटिएम सेवा पुरवली जाते. अनेकदा आपण घाईत असतो तेव्हा पैसे काढताना देखील घाई करतो. अशात खात्यातील पैसे कट होतात मात्र तांत्रिक अडचणीमुळे एटिएममधील पैसे आपल्याला मिळत नाहीत. अनेक व्यक्तींबरोबर हा प्रकार घडला असेल. मात्र असे झाल्यावर घाबरण्याची गरज नाही.
एटिएममधून पैसे काढताना असे घडल्यास काय केले पाहिजे, तुम्हाला तुमचे पैसे परत कसे मिळतील याच विषयी आज माहिती जाणून घेणार आहोत. जेव्हा केव्हा तुमच्याबरोबर असा प्रकार घडेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला त्या एटीएमचा क्रमांक आणि पत्ता याची नोंद घ्यायची आहे. तसेच जवळील बॅंक शाखेत तक्रार दाखल करावी.
ही तक्रार तुम्ही ऑनलाइन पध्दतीने देखील नोंदवू शकता. त्यासाठी अकाउंटचे डिटेल्स आणि एटिएम क्रमांक, लोकेशन ही माहिती भरावी लागते. असा प्रकार घडल्यावर तुमच्याकडे पावती असल्यास उत्तम. कारण तुम्ही व्यवहार केल्याचा हा एक पुरावा आहे. त्याने पैसे मिळवण्यास मदत होईल.
एटिएममध्ये पैसे अडकले असले तरी एटिएम तुम्हाला त्याची पावती देत असते. यात तुमच्या खात्यातुन वजा झालेली रक्कम नमुद असते. जर तुमच्याकडे पावती नसेल तर बॅंक अकाउंट स्टेटमेंट देखील तुम्ही दाखवू शकता. असे केल्यावर बॅंक लगेचच तुम्हाला पैसे देते असे नाही. त्यावर चौकशी होते.
सर्व तपशील तपासल्यावर तुम्हाला पैसे मिळतात. सर्वात आधी बॅंक अशी तक्रार आल्यावर त्यावर शोध आणि केलेली तक्रार खरी आहे का हे तपासते. या सर्वांसाठी बॅंक ७ दिवसांचा कालावधी घेते. याच कालावधीत बॅंकेला तुमच्या खात्यात पैसे जमा करायचे असतात. अशा वेळी तुमच्याकडे बॅंकेचे येत असलेले मॅसेज असणे देखील गरजेचे आहे.
जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तक्रार दाखल करता तेव्हा बॅंकेकडे ७ दिवस असतात. हा कालावधी पुर्ण होउन देखील तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर पुन्हा एकदाल तक्रार दाखल करा. मात्र यात सात दिवसांच्या पुढे तुमचे पैसे अडकून राहिले तर बॅंकेला तुम्हाला दर दिवस १०० रुपये अशी पॅनलटी द्यावी लागते. त्यामुळे जरी तुमचे पैसे अडकले असतील तर चिंता करण्याचे काहीच कारण नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.