18 May 2024 10:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Penny Stocks | बघा असा शेअर हाताला लागतोय का, 9 हजारांच्या गुंतवणुकीवर 1 कोटीचा परतावा, स्टॉक नोट करा

Penny Stocks

Penny Stocks| भारतीय शेअर बाजारात मागील दोन दशके लोकांसाठी संपत्ती निर्माण करून देणारे होते. असे अनेक शेअर आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. असाच एक शेअर आहे ज्याचे नाव आहे, “बालाजी अमाईन्स”. ही कंपनी विशेष रसायने बनवण्याचे काम करते. आणि या मोठया कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. विशेष म्हणजे ज्या लोकांनी दहा हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणुक केली होती, त्यांना या शेअरने आता करोडपती बनवले आहे. दीर्घ मुदतीत बालाजी अमाईन्स कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअरने फक्त अडीच वर्षांत आपल्या शेअर धारकांना 1150 टक्के परतावा कमावून दिला आहे.

परताव्याची गणना :
बालाजी अमाईन्स कंपनी शेअर गेल्या काही काळात 19 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. पण शेअर बाजारातील तज्ज्ञ अजूनही या स्टॉकवर सकारात्मक आहे. त्यांच्या मते, या शेअरमध्ये पुढील काळात जबरदस्त तेजी येण्याचे संकेत मिळत आहेत. केआर चोकसी फर्मने या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला असून, त्यासाठी 4313 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. हा स्टॉक सध्याच्या किंमतीपेक्षा 43 टक्क्यांपर्यंत वर उसळी घेईल, असा अंदाज आहे. बालाजी अमाईन्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 28 ऑक्टोबर 2022 रोजी बीएसईवर 1.15 टक्क्यांच्या वाढीसह 3013.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

बालाजी अमाईन्स कंपनीच्या शेअरची किंमत 2002 साली म्हणजेच वीस वर्षांपूर्वी फक्त 2.63 रुपये होती, ज्यात आता वाढ होऊन किंमत 3013.80 रुपयेपर्यंत वाढली आहे. कंपनीच्या रिटर्न्सबद्दल बोलायचे झाले तर, या कंपनीच्या स्टॉकने गेल्या 20 वर्षात आपल्या शेअर धारकांना 1,14,225 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही त्या वेळी या स्टॉकमध्ये फक्त 9 हजार रुपये लावले असते, तर आज तुमची गुंतवणुक वाढून एक कोटी रुपयेपेक्षा जास्त झाली असती.

चालू वर्ष 2022 मध्ये बालाजी अमाईन्स कंपनीच्या शेअरने 4 जानेवारी 2022 रोजी 3,936.95 रुपयांचा आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. तथापि, आता हा स्टॉक सध्या 3013.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक त्याच्या उच्चांक किंमत पातळीवरून आता स्वस्तात मिळत आहे.

स्टॉकची पुढील वाटचाल :
KR चोकसी फर्ममधील गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, बालाजी अमाईन्स कंपनीने कमी स्पर्धेसह आवश्यक उत्पादने आणि उत्पादनांच्या आयातीवर धोरणात्मक गुंतवणूक वाढवली आहे. ज्यामुळे आगामी काळात कंपनीची चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळेच गुंतवणूक बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Balaji Amines share price return on investment on 1 November 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x