
EPF Money Withdrawal | नोकरी करणा-या प्रत्येकच व्यक्तीचे ईपीएफ खाते असते. एम्लॉई प्रॉव्हिडंट फंड मध्ये तुमच्या पगाराची काही टक्के रक्कम जमा केली जाते. यात तुम्हाला कोणताही अतीरिक्त कर भरावा लागत असेल तर तो माफ केला जातो. तसेच तुम्ही सलग ५ वर्षे पूर्ण केल्यावर या खात्यावर तुम्हाला TDS आकारला जातो. यासाठी तुम्ही एकाच ठिकाणी नोकरी केली पाहिजे असा काही नियम नाही. तुम्ही दुस-या ठिकाणी देखील ५ वर्षांच्या काळत नोकरी करु शकता. मात्र यात मुदती आधी पैसे काढल्यास नुकसान होते.
यात महत्वाची बाब अशी की तुम्ही एखाद्या कंपनीत कंत्राटी तत्वावर काम करत असाल तर या दरम्यामन तुम्हाला पीएफ भरावा लागत नाही. जर तुम्हाला काही महिन्यांनी किंवा वर्षांनी नोकरीवर पगार देत नोकरी कायमस्वरूपी दिली तर मग तुमचा पीएफ कट करण्यास सुरूवात होते. जर तुम्ही सध्याच्या कंपनीत ५ वर्षे पूर्ण केली आणि नंतर कंपणी बदलल्यावर पीएफ मधून पैसे काढले तर टीडीएस कट केल्याचे तुम्हाला समजेल.
अनेकांना असा प्रश्न पडतो की आधिची कंपनी सेडून दुसरीकडे रुजू झाल्यानंतर पैसे काढल्यास टीडीएस का कापला जातो. तर तुम्ही त्या कंपनीत ५ वर्षे काम केले तरी तुमचा काळ ३ वर्षांचा मोजला जातो. कारण आधिच्या दोन वर्षांत तुम्ही कंत्राटी तत्वावर होतात. त्यानंतर ३ वर्षे काम केले आहे. म्हणजे तुमचे दोन वर्षे वजा करुण ३ वर्षेच धरली जातात. मात्र यातून वाचण्यासाठी देखील काही उपाय आहेत.
असा वाचवा टीडीएस
* जेव्हा तुम्ही नोकरी बदलता तेव्हा पीएफमधून पैसे काढू नका. तुम्ही आधिच्या कंपनीतील पीएफ सध्याच्या कंपनीत वळवू शकता. त्यामुळे तुमचे होणारे नुकसाण टाळता येते.
* काही झाले तरी ५ वर्षांच्या कालावधीत पीएफचे पैसे काढू नका. ५ वर्षांनी तुम्ही पैसे काढाल तर टीडीएस कट होत नाही.
* जर तुमची अडचण मोठी असेल आणि पैसे काढण्याशीवाय कोणताही पर्याय नसेल तर तुम्ही ५०,००० रुपयांपेक्षा कमी पैसे काढा. कारण ५०,००० पेक्षा कमी रकमेवर टीडीएस कापत नाहीत.
* यावेळी कर कापण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही काढलेली रक्कम करपात्र ब्रॅकेटमध्ये येत असेल तर आयटीआरमध्ये त्याची माहिती द्या.
* जर तुम्ही ५०,००० पेक्षा जास्त रक्कम काढली असेल तर १५G किंवा १५H भरावा. अन्यथा १० टक्के टीडीएस कापला जातो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.