
LPG Booking Offer | महागाइने सर्वसामान्य नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. त्यात एलपीजी गॅस सिलेंडरचे दर सातत्याने वाढत आहेत. महागाइच्या युगात एलपीजी सिलेंडरचा भडका उडाला आहे. मात्र असे असले तरी गॅस सिलेंडर खरेदी करण्याव्यतीरिक्त कोणता पर्याय नाही. मात्र यात तुम्हाला थोडा दिलासा म्हणून कॅशबॅक किंवा पैशांची सुट मिळाली तर. प्रत्येकालाच याचा आनंद होईल.
आज अनेक व्यक्ती लाइटीचे बिल, गॅस सिलेंडर आणि इतर खर्च किंवा बिल ऑनलाइन पध्दतीने भरतात. यात विशेष सुट मिळते. सध्या पेटीएम, फ्रीचार्ज आणि बजाज फिनसर्व्ह आशा ऍपचा वापर करतात. तुम्ही या ऍपचा वापर करुण तुमच्या गॅस सिलेंडरमधील थोडे पैसे वाचवू शकता. यात बराचसा डिस्काउंट आणि ऑफर देखील मिळतात.
अशी मिळवा २०० रुपयांची सुट
तुम्ही पाहिल्यांदाच फ्रिचार्जचा वापर एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी करत असाल तर तुम्हाला २०० रुपयांची सुट मिळू शकते. कारण पहिल्यांदा याचा वापर करणा-यांना २० टक्के कॅशबॅक दिला जातो. यात तुम्हाला एचपी, भारत. इंडीअन असे तीन्ही प्रकारचे गॅस बूक करु शकता. त्यामुळे तुम्ही या ऍपमार्फत तुमचे बरेच पैसे साठवू शकता.
असे वापरा फ्रिचार्ज ऍप
* सर्वात आधी तुम्हाला फ्रिचार्ज ऍप डाउनलोड करावे लागेल.
* त्यातील गॅस प्रोव्हायडर हा पर्याय निवडा.
* त्यात तुमचा लिंक असलेला संपर्क क्रमांक टाका.
* त्यानंतर पेमेंटचा ऑप्शन येईल.
* नेट बॅंकींग किंवा डेबिट कार्डचा वापर करुन पेमेंट करा.
* कॅशबॅक मिळवताना तुम्हाला GAS100 हा प्रोमोकोड टाकावा लागेल.
* पेमेंट पूर्ण झाल्यावर तुमचा गॅस बुक होईल.
* त्यानंतर दोन दिवसांनी तुम्हाला कॅशबॅक मिळेल.
बजाज फिनसर्व्ह देईल १० टक्के कॅशबॅक
बजाज फिनसर्व्हमध्ये गॅस बुक केल्यावर देखील कॅशबॅक मिळते. यात तुम्हाला ७० रुपये कमितकमी मिळतील. तर १० टक्के सुध्दा कॅशबॅक मिळते. यासाठी तुम्हाला बजाज पे यूपिआय फिनसर्व्ह ऍप डाउनलोड करावे लागेल.
* आधी ऍप ओपन केल्यावर बजाज फिनसर्व्ह हा पर्याय निवडावा.
* त्यात सिलेक्ट प्रोव्हायडर हा पर्याय येईल. त्यातील तुमची कंपनी निवडा.
* पेमेंटसाठी बजाज फिनसर्व्ह पे यूपिआयची निवड करा.
* तुमचा कॅशबॅक पेमेंट पूर्ण झाल्यावर २ दिवसांनी तुमच्या खात्यात जमा होईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.