
Hot Stocks | शेअर बाजार तेजीत असताना जे लोक गुंतवणूक करतात, त्यांना योग्य वेळी त्याचे फळ मिळते. मजबूत स्टॉक मध्ये पैसे लावल्यावर गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स, लाभांश आणि भरघोस परताव्यांचा लाभ मिळतो. GPT इन्फ्राप्रोजेक्ट्स ही अशा काही कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिल्यानंतर बोनस शेअर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने अलिकडील काही जबरदस्त कामगिरी केली आहे. चला तर मग जाणून घेऊ बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख
बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट :
BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार, “GPT INFRAPROJECTS कंपनीने बोनस शेअर्सच्या वाटपसाठी 12 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव परित केला आहे. 12 नोव्हेंबर 2022 या तारखेपर्यंत सर्व शेअर्स धारकांचे नाव रेकॉर्ड बुकमध्ये सामील केले जाईल. या सर्व शेअर धारकांना कंपनीच्या वतीने बोनस शेअर्स मोफत देण्यात येईल.
कंपनीची कामगिरी :
कोरोना लॉकडाऊन नंतर या कंपनीच्या शेअरची किमत कमालीची वाढली आहे. मागील 6 महिन्यांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, सहामाही काळात या कंपनीच्या शेअरची किंमत 90 रुपयांवर आली होती, त्यात वाढ होऊन आता किंमत 126.75 रुपयांपर्यंत गेली आहे. म्हणजेच मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीमध्ये 40 टक्क्यांची मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी, जर तुम्ही 2022 चे चार्ट पॅटर्न पाहिले तर कंपनीच्या शेअर्समध्ये 50 टक्के वाढ झालेली दिसून येईल. गेल्या 2 वर्षांपूर्वी GPT INFRAPROJECTS कंपनीचे शेअर 26.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या शेअर्स ची किंमत 126.75 रुपयांपर्यंत गेली आहे. गेल्या दोन वर्षांत, स्थितीगत दीर्घकालीन शेअर धारकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून 375 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावला आहे.
कंपनीच्या शेअरची वाटचाल :
एक वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये NSE निर्देशांकावर ज्या लोकांनी गुंतवणूक केली होती, त्यांना आता 48.62 टक्के नफा झाला असणार. या कंपनीची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 140.68 रुपये आहे. त्याच वेळी, NSE निर्देशांकावर या कंपनीची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 67.50 रुपये होती. कंपनीचे बाजार भांडवल 368 कोटी रुपये असून ही कंपनी स्मॉल कॅप गटात मोडते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.