7 May 2024 2:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Money Making Stock | 3 वर्षांत 450 टक्के परतावा तर 6 महिन्यांत 45 टक्के परतावा, या शेअरची अचानक खरेदी का वाढली पहा

Money Making Stock

Money Making Stock | 2022 हे वर्ष शेअर बाजारासाठी फारसे बरेच चढ-उतार आणि अस्थिरता घेऊन आले आहे. एकीकडे बड्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांची घोर निराशा केली असून, अशा अनेक अमोल कॅप कंपन्या आहेत ज्यांनी आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. अक्षरशः स्मॉल कॅप कंपनीमध्ये गुंतवणूक करून लोकांनी भरघोस परतावा कमावला आहे, आणि आता ते गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. स्मॉल कॅप कंपनी “मान अॅल्युमिनियम लिमिटेड” ही अशी एक स्मॉल कॅप कंपनी आहे, जिने आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा देऊन खुश केले आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने आता आपल्या शेअर धारकांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने नुकताच विद्यमान शेअर धारकांना लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. कंपनीने या लाभांश वितरण करण्यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.

लाभांश वितरण करण्याची रेकॉर्ड डेट :
मान अॅल्युमिनियम कंपनीने स्टॉक एक्सचेंज सादर केलेल्या अहवालात म्हंटले आहे की, “5 नोव्हेंबर 2022 रोजी मान अॅल्युमिनियम कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 1 रुपये इतका अंतरिम लाभांश देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कंपनीने यासाठीचा प्रस्ताव मंजूर करून नियामकला पाठवला आहे. या लाभांशासाठी, कंपनीने शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मन अल्युमिनियम कंपनीचे शेअर 4.48 टक्क्यांनी गडगडले होते, आणि 180 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील 5 वर्षाचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, मान अॅल्युमिनियमच्या शेअरच्या किमतीत फक्त 181.12 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी, मागील 3 वर्षांत या कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 450 टक्क्यांचा परतावा कमावून दिला आहे. गेल्या एका वर्षात मान अॅल्युमिनियम कंपनीच्या शेअर्सची किंमत 39.86 टक्के वाढली आहे.

2022 या वर्षात रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे शेअर बाजारात नकारात्मक उलाढाल दिसून येत आहे. जगातील सर्व शेअर बाजार गोंधळात व्यापार करत आहेत. जागतिक आर्थिक मंदी येण्याचे संकेत मिळत आहेत. अशा कठीण काळातही मन अल्युमिनियम कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 45.63 टक्क्यांनी वर गेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत कंपनीमध्ये प्रमोटरकडे कंपनीचा एकूण 66.04 टक्के वाटा होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money Making Stock of Maan Aluminium Share price return on investment on 07 November 2022.

हॅशटॅग्स

Money Making Stock(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x