8 May 2024 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Sai Silks IPO | साई सिल्क कंपनीच्या IPO लाँच होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा आणि पैसा वाढवा

Sai Silk IPO

Sai Silks IPO| इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये गुंतवणूक करून कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कलामंदिर या दक्षिण भारतीय जातीय पोशाखाचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या साई सिल्क कंपनीच्या IPO ला स्टॉक मार्केट नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI ने आता हिरवा कंदील दाखवला आहे. साई सिल्क कंपनी आपला IPO खुल्या बाजारात आणून 1,200 कोटी रुपये जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे.

स्टॉक मार्केट नियामक SEBI कडे सादर केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस/DRHP नुसार साई सिल्क या कंपनीच्या IPO अंतर्गत 600 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विक्रीसाठी आणले जातील. याशिवाय, कंपनीचे प्रमोटर्स आणि गुंतवणूक समूह संस्थांद्वारे 18,048,440 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीसाठी खुल्या बाजारात आणले जाणार आहे.

IPO मधील पैशाचा वापर :
स्टॉक मार्केट नियामक SEBI ने मंगळवारी आपल्या अधिकृत वेबसाइटवर साई सिल्क कंपनीच्या IPO ची सविस्तर माहिती दिली असून या IPO ला मंजुरी देत असल्याचे जाहीर केले आहे. साई सिल्क कंपनीचा आयपीओ आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शेअर बाजारातील बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साई सिल्क कंपनी या IPO इश्यूमधून 1,200 कोटी रुपये जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि त्यात ती यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. ही कंपनी आपल्या IPO मध्ये फ्रेश शेअर्सच्या विक्रीतून मिळालेले पैसे 25 नवीन स्टोअर्स सुरू करण्यासाठी वापरणार आहे. आणि कंपनी 2 वेअरहाऊस बांधण्यासाठी आणि खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी देखील या पैशाचा वापर करणार आहे. सध्या कंपनीचे 50 पेक्षा अधिक आउटलेट कार्यरत आहेत.

आणखी एका IPO ला हिरवा कंदील :
वित्तीय सेवा देणाऱ्या KFin Technologies कंपनीच्या IPO ला स्टॉक मार्केट नियामक SEBI ने हिरवा कंदील दाखवला आहे. IPO लाँच करण्यासाठी KFin Technologies कंपनीने 31 मार्च 2022 रोजी सेबीकडे कागदपत्रे दाखल केले होते. कंपनीला 7 नोव्हेंबर 2022 रोजी निरीक्षण पत्र प्राप्त झाले आहे. या IPO चा आकार 2400 कोटी रुपये असून हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Sai Silk IPO is ready to launch on stock market and SEBI has given green signal to this IPO for Launching 16 November 2022.

हॅशटॅग्स

Sai Silk IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x