
Stock Investment | सर्व शेअर मार्केट अप्रत्याशित असतात कारण कोणत्या कंपनीचा स्टॉक कधी तेजीत धावेल आणि मल्टीबॅगर परतावा देईल याचा नेम नाही. त्याचबरोबर शेअर बाजारात चढ-उतारचे चक्र हे चालूच असते. मागील काही आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये थोडीफार वाढ पाहायला मिळाली होती. भारतीय शेअर बाजार जबरदस्त तेजीत वाढत असून पुन्हा एकदा शेअर बाजार सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा एकदा नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. सेन्सेक्स सध्या 61,955.96 अंकावर पोहचला असून निफ्टी 18,427.95 अंकावर ट्रेड करत आहे.
या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी :
शेअर बाजारात असे तीन स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या तिन्ही कंपनीच्या शेअर्सनी अल्पावधीत आपल्या शेअर धारकांचे पैसे वाढवले आहेत. या स्टॉकनी 15 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीला स्पर्श केला होता. या लिस्ट मध्ये रेल विकास, अपोलो टायर्स आणि इंडियन बँक कंपनीच्या शेअर्सचा यांचा समावेश होतो. या तिन्ही कंपन्यांच्या शेअर्सनी काल आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.
Rail Vikas :
रेल विकास कंपनीच्या स्टॉकमध्ये कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. हा शेअर 15 नोव्हेंबर 2022 रोजी 61.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. काल या स्टॉकने 61.75 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळीवर स्पर्श केली होती. या स्टॉकची 52 आठवड्यांची कमी नीचांक किंमत पातळी 29 रुपये होती.
अपोलो टायर्स :
अपोलो टायर्स कंपनीच्या शेअर्समध्ये ही काळ कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. अपोलो टायर्स कंपनीचा शेअर 15 नोव्हेंबर 2022 रोजी 298 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ट्रेडिंग सेशन दरम्यान या समभागाने 303.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीला ही स्पर्श केला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 165.25 रुपये होती.
इंडियन बँक :
इंडियन बँकेच्या शेअरमध्ये काळ जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. इंडियन बँकेचा शेअर 15 नोव्हेंबर 2022 रोजी 273 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या बँकेच्या शेअरने कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 273.50 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. दुसरीकडे, इंडियन बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 130.90 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.