
Driving License Rules | भारतात ड्रायव्हिंग लायसन्स बनवणं हे सर्वात आव्हानात्मक काम आहे. ते बनवण्यासाठी अनेकदा ड्रायव्हिंग टेस्टमधून जावं लागतं. आता ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स बनवत असाल तर आरटीओच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. इतकंच नाही तर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्हाला कोणतीही वेगळी टेस्ट द्यावी लागणार नाही. वास्तविक, लागू करण्यात आलेल्या नव्या नियमावलीमुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय रस्ते, महामार्ग आणि वाहतूक मंत्रालयाने लागू केलेल्या नव्या नियमांनुसार ड्रायव्हिंग परमिटसाठी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाता येईल. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुमचं नाव नोंदवा. तुम्ही शाळेत प्रवेश घेऊन ड्रायव्हिंग शिकू शकता. यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूलकडून परीक्षेच्या आधारे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र परमिट पेपरसोबत ठेवावे लागणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही. ड्रायव्हिंग परमिट मिळेल. यामुळे तुमचा वेळ तर वाचणारच, शिवाय लांब रांगेत उभं राहण्याची समस्याही कमी होईल.
ही प्रक्रिया फॉलो करा :
* ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावं लागतं.
* ड्रायव्हिंग स्कूलची वैधता पाच वर्षांपेक्षा जास्त असावी हे लक्षात ठेवा.
* ड्रायव्हिंग स्कूलने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. येथून मिळणार प्रमाणपत्र .
* या प्रमाणपत्राच्या आधारे आरटीओकडून ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येणार आहे.
* ड्रायव्हिंग स्कूलच्या अभ्यासक्रमात रस्त्यावरील शिष्टाचार, रोड रेज, वाहतुकीचे नियम, प्रथमोपचार, अपघाताचे कारण आणि वाहन चालवताना मायलेज अशा गोष्टींचा समावेश करावा लागणार आहे. अभ्यासक्रमाचा थिअरी भाग आठ तास चालेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.