
Multibagger Stock | 2022 या वर्षात बऱ्याच कंपनीचे आयपीओ शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले होते, मात्र त्यातील काही IPO हवा तसा बंपर परतावा देऊ शकले नाहीत. 2021 मध्ये अनेक कंपन्यांचे IPO आले आणि शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर त्यांनी गुंतवणूकदारांना बंपर परतावा देऊन श्रीमंत केले होते. अशाच एका कंपनीबद्दल आपण माहिती जाऊन घेणार आहोत, जिचे नाव आहे,’EKI एनर्जी सर्व्हिस’. या कंपनीचा IPO 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता, आणि त्यानंतर स्टॉक ने कमालीचे प्रदर्शन केले. आता शेअरच्या किंमतीत IPO आल्यानंतर 1349.02 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
EKI एनर्जी सर्व्हिस शेअरची किंमत :
या कंपनीचा IPO मार्च 2021 मध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IPO इश्यूमध्ये शेअरची किंमत 102 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. 7 एप्रिल 2021 रोजी EKI एनर्जी सर्व्हिस कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 140 रुपये प्रति शेअर या किमतीवर ट्रेड करत होते. EKI एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर सध्या 1,478.90 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत आहे . IPO मध्ये या शेअरची किंमत 102 रुपये होती, आता हा स्टॉक 1,478.90 रुपयेपर्यंत वाढला आहे. IPO लिस्टिंगच्या फक्त एका वर्षात या स्टॉकने आपल्या शेअरधारकांना 1349.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 9 एप्रिल 2021 रोजी या कंपनीचे शेअर 40.51 रुपयांपर्यंत पडले होते. या किमतीनुसार गणना केली तर या स्टॉकने लोकांना आत्तापर्यंत 3550 टक्के परतावा कमावून दिला आहे.
शेअरची किंमत 12,500 रुपये पार :
EKI एनर्जी सर्व्हिस कंपनीचा स्टॉक सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंत कमालीचा वाढला आहे. जानेवारी 2022 मध्ये या स्टॉक ने आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती, आणि नंतर स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढू लागला. मागील एका महिन्यात या कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 14.13 टक्के पेक्षा अधिक कमजोरी पाहायला मिळाली होती. 2022 या वर्षात या स्टॉकमध्ये 43 टक्क्यांहून अधिक पडझड पाहायला मिळाली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.