
Stock To Buy | बँक ऑफ बडोदा या PSU बँकेने मागील वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या बँकिंग स्टॉकने मागील वर्षभरात आपल्या शेअर धारकांना 80 टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे. पुढील काही दिवसांत हा बँकिंग स्टॉक 170 रुपये किंमत स्पर्श करेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात हा स्टॉक 168.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
BoB स्टॉक Buy, Sell, Hold?
बँक ऑफ बडोदा या PSU बँकेच्या शेअर्सवर तज्ज्ञांनी सकारात्मक मत व्यक्त केले आहे. 32 पैकी 28 तज्ञ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. 16 जणांनी BoB स्टॉक ताबडतोब खरेदी करण्याची शिफारस केली आहे. त्याच वेळी चार विश्लेषक BoB चा स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला देत आहेत. आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मने या शेअरसाठी 170 रुपयांची लक्ष्य किंमती जाहीर केली आहे.
बँक ऑफ बडोदा शेअर किंमत इतिहास :
जर आपण बँक ऑफ बडोडाचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, मागील एका आठवड्यात या बँक स्टॉक ने 3 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात स्टॉकची किंमत 17 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे. मागील 3 महिन्यांत या स्टॉकमध्ये 39 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली होती. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 169.20 रुपये आहे. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 77.05 रुपये होती.
सप्टेंबर तिमाहीचा निकाल :
बँक ऑफ बडोदा कंपनीचे सप्टेंबर तिमाही निकाल जबरदस्त होते. या तिमाहीत बँकेच्या एकूण महसुलात 21.99 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या बँकेने कर कपाती नंतर 3400 कोटी रुपयांचा निव्वळ नफा संकलित केला आहे. बँकेच्या PAT मध्ये 75 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.