5 May 2024 11:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Tecno Pova 4 | 50 MP कॅमेरा आणि दमदार बॅटरी, टेक्नो पोवा 4 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमतही स्वस्त

Tecno Pova 4

Tecno Pova 4 | टेकनो पोवा 4 स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. टेक्नो पोवा ३ मध्ये अपग्रेड म्हणून हा नवा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या नव्या हँडसेटमध्ये मीडियाटेक हीलियो जी ९९ प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनलमध्ये डायमंड कट डिझाइनही देण्यात आले आहे. फोनमध्ये रियरमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेराही दिला आहे. फोनच्या डिस्प्लेमध्ये सेल्फीसाठी वॉटरड्रॉप नॉच देखील आहे.

टेक्नो पोवा ४ च्या सिंगल ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये असून ब्लू आणि ग्रे कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आली आहे. अॅमेझॉनवरून १३ डिसेंबरपासून ग्राहकांना हा नवा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. चला तर मग त्याची बाकी स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात.

स्पेसिफिकेशन्स
टेक्नोचा नवा स्मार्टफोन अँड्रॉइड १२ बेस्ड हायओएस १२ वर चालतो आणि १८० हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.८२ इंच एचडी + (१६४० × ७२० पिक्सल) आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ९९ प्रोसेसर असून माली जी ५७ जीपीयू, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे.

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर रियरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपचा प्रायमरी कॅमेरा ५० एमपीचा आहे. तसेच एलईडी फ्लॅशसह एआय लेन्सही येथे देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये फ्रंटमध्ये 8 एमपी कॅमेरा दिला आहे.

बॅटरी
कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत यात ४जी, ड्युअल सिम, वाय-फाय ८०२.११ एसी, ब्लूटूथ ५, जीपीएस, ग्लोनास आणि बेईडोचा सपोर्ट देण्यात आला आहे. फिंगरप्रिंट सेन्सर येथे साइडला लावलेला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी ६००० एमएएच इतकी असून १८ वॉट फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट आहे. टेक्नो पोवा ४ चे वजन २१२ ग्रॅम असून त्याचे वजन १७०.५९ × ७७.५२ × ८.७ मिमी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tecno Pova 4 smartphone launched in India check price details on 07 December 2022.

हॅशटॅग्स

#Tecno Pova 4(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x