14 May 2025 12:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी; शेअर प्राईसमध्ये मोठी तेजी दिसणार, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, बाय कॉल सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर्सची जोरदार खरेदी, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BEL BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL
x

Money Making Share | मस्तच! या मल्टीबॅगर शेअरने फक्त 6 महिन्यांत 145% पेक्षा जास्त परतावा दिला, स्टॉक डिटेल सेव्ह करा

Money Making Share

Money Making Share | पॉवर मेक प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मार्केट ओपनिंगमध्ये बीएसई इंडेक्सवर 2,374 रुपये ही नवीन विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. मागील सहा महिन्यांत या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या शेअर धारकांना अप्रतिम रिटर्न्स देऊन कामालीची कामगिरी केली आहे.

पॉवर मेक प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील सहा महिन्यांत 145 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. हा स्टॉक 960 रुपये प्रति शेअर या ट्रेडिंग किमतीपासून तेजीत आला, आणि सध्या सर्वकालीन उच्चांक किमती ट्रेड करत आहे. गेल्या एका वर्ष कालावधीत या इन्फ्रा कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात 137 टक्क्यांची वाढ केली आहे.

या वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून RITES कंपनीसह Power Mech Projects Ltd च्या संयुक्त उपक्रमला 499 कोटी रुपयेची ऑर्डर मिळाली आहे. हा प्रकल्प RITES-PMPL ला हस्तांतरित करण्यात आला आहे. स्टॉक मार्केट नियामक फाइलिंगनुसार, बेंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज-II च्या रीच-II विस्तारामध्ये चालघट्टा या ठिकाणी मेट्रो डेपो प्लस वर्कशॉपचे बांधकाम करण्याची ऑर्डर कंपनीला मिळाली आहे.

हैदराबाद स्थित पॉवर मेक प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी भारतातील आघाडीच्या पायाभूत सुविधाचा विकास आणि बांधकाम प्रकल्प निर्माण करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचा व्यवसाय जगभर पसरला असून ती ऊर्जा आणि पायाभूत सुविधा विकास क्षेत्रांमध्ये आपल्या सेवा प्रदान करते. 1999 साली पॉवर मेक प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीची स्थापना एस. किशोर बाबू यांनी केली होती. एस. किशोर बाबू हे एक अभियांत्रिकी उद्योजक असून ते सध्या पॉवर मेक प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे ​​अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक पदावर काम करत आहेत.

एकात्मिक पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस प्रदान करणारी कंपनी म्हणून पॉवर मेक प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे नाव बाजारात प्रसिद्ध आहे. ही कंपनी बॉयलर, टर्बाइन आणि जनरेटरचे सर्वसमावेशक उत्पादन, चाचणी आणि कार्यक्षमता तपासणी, नागरी कामे आणि ऑपरेशन, अभियांत्रिकी देखभाल या सर्व सेवा आपल्या ग्राहकांना प्रदान करते. नोव्हेंबर 2022 या कालावधी पर्यंत पॉवर मेक प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे 44 AMC प्रकल्प आणि 11 परदेशी प्रकल्पांसह एकूण 112 स्वदेशी प्रोजेक्ट देशभरात चालू आहेत.

मागील महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूकदाराच्या बैठकीत कंपनीने माहिती दिली की, कंपनी आपला उद्योग विस्तार करण्याच्या हेतूने रेल्वे, जल प्रकल्प, रस्ते, कोळसा खाण, ऊर्जा, स्टील प्लांट ऑपरेशन्स, मटेरियल हाताळणी, तेल आणि वायू क्षेत्रातील मूल्य साखळी, क्रॉस कंट्री पाइपलाइन या नवीन क्षेत्रांमध्ये नवीन उद्योग संधी शोधत आहे. कंपनीने शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांवरही आपले लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीचा उदेश्य उद्योग विस्तार करणे आणि जास्त नफा कमावणे हा आहे.

याशिवाय कंपनी आपल्या प्रोजेक्ट साइटवर होणारे अतिरिक्त बांधकाम खर्च कमी करून, प्रोजेक्ट खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. चांगल्या वितरणसेवा सुविधा निर्माण करण्यासाठी कंपनी नियोजित गुंतवणूकीसह हेवी स्टील फॅब्रिकेशन ऑपरेशन्सवर लक्ष देत आहे. “O&M हा एक प्रमुख चालक असून ऊर्जा क्षेत्र, कॅप्टिव्ह सेक्टर आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नॉन-पॉवर उद्योग क्षेत्रात प्रवेश करून 3 वर्षांत उद्योग वाढीचे प्रमाण दुप्पट करण्याचे उद्दिष्ट कंपनीने निर्धारित केले आहे”.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money Making Share of Power Mech project limited share price return on investment on 12 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या