
Stock In Focus | आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा स्टॉकची माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांचे 99 टक्के पैसे बुडवले आहेत. या कंपनीचा शेअर एकेकाळी स्टॉक मार्केटवर वर्चस्व गाजवत होता. नंतर या कंपनीचे दिवस फिरले, आणि वाईट काळ सुरू झाला. सध्या या कंपनीचा शेअर 2.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 10 जानेवारी 2008 रोजी या कंपनीचा शेअर 820.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ही किंमत या स्टॉकची सर्वकालीन उच्चांक किंमत होती. आपण ज्या कंपनीच्या शेअर बद्दल चर्चा करत आहोत, ती अनिल अंबानी यांची ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’ म्हणजेच Rcom आहे. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे 99.30 टक्के शेअर्स बुडवले आहेत.
Rcom शेअर्सची वाटचाल :
रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, हा शेअर मागील अनेक वर्षांपासून सतत पडत आहे. मागील 16 वर्षांत या स्टॉक 300.5 रुपये किमतीवरून 2.10 रुपयेवर आला आहे. म्हणजेच ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली होती, त्यांचे गुंतवणूक मूल्य आता 700 रुपयांवर आले आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती, ते आतापर्यंत कंगाल झाले आहेत.
कर्जबाजारी अंबानी :
कर्जबाजारी उद्योगपती अनिल धीरूभाई अंबानी यांच्या उद्योग समूहाची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स/Rcom ही दिवाळखोर घोषित झाली आहे. एकेकाळी ही Rcom कंपनी दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी मानली जातो होती, परंतु भारतीय टेलिकॉम क्षेत्रात प्रचंड टॅरिफ युद्ध सुरू झाल्यामुळे Rcom कंपनीला खूप नुकसान झाले. टेलिकॉम क्षेत्रातील हे टॅरिफ युद्ध खुद्द अनिल अंबानी यांचे मोठे भाऊ मुकेश अंबानी यांनी आपल्या जिओ कंपनीच्या माध्यमातून सुरू केले. जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांना मोफत कॉल्स आणि स्वस्त डेटा उपलब्ध करून दिला, आणि इथूनच Rcom ची इतश्री सुरू झाली. खुद्द मुकेश अंबानी यांनी आपले बंधू अनिल अंबानी यांची Rcom कंपनी उद्ध्वस्त करून टाकली. Rcom कंपनीवर खूप मोठे कर्ज झाले, आणि कंपनी ते कधीही परतफेड करु शकली नाही, म्हणून Rcom दिवाळखोर झाली.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.