 
						Sarkari Share | पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स BSE निर्देशांकावर 56.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्समध्ये मागील 6 महिन्यांत अप्रतिम उसळी पाहायला मिळाली आहे. या सरकारी बँकचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 80 टक्के वधारले आहेत. 10 जून 2022 रोजी PNB बँकेचे शेअर्स 30.90 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 9 डिसेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर PNB बँकचे शेअर्स 59.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या सरकारी बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत 28.05 रुपये होती.
क्वांट स्मॉल कॅप MF ने वाढवली गुंतवणूक :
क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाने पंजाब नॅशनल बँकमध्ये आपली गुंतवणुक वाढवली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पोर्टफोलिओ स्टेटमेंटमधून माहिती समोर आली आहे की, क्वांट स्मॉल कॅप MF ने PNB बँकेतील आपली गुंतवणूक वाढवून जवळपास दुप्पट केली आहे. क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड स्कीम स्मॉल कॅप श्रेणीतील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या म्युचुअल फंड योजनेपैकी एक आहे. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत क्वांट स्मॉल कॅप MF कडे पंजाब नॅशनल बँकेचे 23,179,000 होल्ड आहेत. ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये पंजाब नॅशनल बँकेमध्ये क्वांट स्मॉल कॅप MF ची गुंतवणूक दुप्पट झाली आहे. PNB चे शेअर्स क्वांट MF फंडाच्या 2,580 कोटी रुपयांच्या AUM च्या तुलनेत 4.6 टक्के आहेत.
एका वर्षात दिला 46 टक्के परतावा :
पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्समध्ये चालू वर्षात आतापर्यंत 46 टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 3 जानेवारी 2022 रोजी PNB बँकेचे शेअर्स BSE निर्देशांकावर 38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स 9 डिसेंबर 2022 रोजी BSE इंडेक्सवर 56.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात PNB च्या शेअर्समध्ये 37 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. PNB चे बाजार भांडवल 61,940 कोटी रुपये आहे. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत PNB बँकेने 20154.02 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत PNB बँकेने 411.27 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
म्युच्युअल फंडांनी गुंतवणूक वाढवली :
व्हॅल्यू रिसर्चने क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाला 5 स्टार रेटिंग देऊन सर्वात जास्त परतावा कमावून देणारा म्युचुअल फंड घोषित केले आहे. Quant Small Cap MF ने मागील 3 वर्षात 56 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात या म्युचुअल फंडने 24 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. क्वांट स्मॉल कॅप MF च्या टॉप शेअर होल्डिंग्समध्ये ITC लिमिटेड, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड, RBL बँक, HFCL लिमिटेड, इंडिया सिमेंट्स, या कंपनीचे शेअर्स सामील आहेत. नुकत्याच सूचीबद्ध झालेल्या Archean केमिकल इंडस्ट्रीज आणि बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचे शेअर्स देखील क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 गुंतवणुकीत सामील आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		