
IPO Investment | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 1 : 5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्यास मंजुरी दिली आहे. मागील एका वर्षात सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून नावारूपाला आले आहेत. NSE SME निर्देशांकावर ट्रेड करणारा हा स्टॉक हा भारतातील मल्टीबॅगर IPO कंपनीपैकी एक आहे. या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई दिली आहे.
कंपनीचे स्पष्टीकरण :
सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड या इन्व्हर्टर बनवणाऱ्या कंपनीने माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचे 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरमध्ये विभाजन करण्यास मंजुरी दिली आहे. NSE SME निर्देशांकावर ट्रेड करणारा हा स्टॉक 2017 साली 31 रुपये प्रति शेअर या किमतीवर सूचीबद्ध झाला होता. सध्या हा मल्टीबॅगर SME स्टॉक 162 रुपये प्रति इक्विटी शेअर या किमतीवर ट्रेड करत आहे. सध्याची ट्रेडिंग किंमत ही स्टॉकच्या इश्यू किमतीच्या 5 पट अधिक आहे. त्यामुळे या SME कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून लोकांनी बंपर परतावा कमावला आहे.
1.24 लाख रुपयेवर दिला 6.34 लाख परतावा :
सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड या SME स्टॉक कंपनीने आपल्या अल्पावधीत आपल्या शेअर धारकांना उत्कृष्ट परतावा मिळवून दिला आहे. IPO मध्ये शेअर्सचे वाटप झाल्यापासून आतापर्यंत ज्या लोकांनी आपले शेअर्स होल्ड करून ठेवले होते, त्यांच्या 1.24 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 6.34 लाख रुपये झाले आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर धारकांना 400 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड ही स्मॉल कॅप कंपनी काही महिन्यापूर्वी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड/BPCL कडून 46.2 कोटी रुपयेची ऑर्डर मिळवण्यासाठी चर्चेचा विषय बनली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.